म्हाडा पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतलं

शरद भुसारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

        पोलीस यंत्रणा सक्रिय झाली ...

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे : जिलानी ( मुन्ना ) शेख

 पुणे – आरोग्यभरती, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यामधील सहभागांची धरपकड सुरु असतानाच दुसरीकडं म्हाडा पेपरफुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे.शरद भुसारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

 पुणे पोलिसांनी आतापर्यंत म्हाडा पेपर फुटीतील प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या डॉ. प्रीतिश देशमुख, संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांच्या आणखी दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडे चौकशी सुरूच आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत काही आरोपी व पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने तपास थंडावला होता, मात्र आता पोलीस यंत्रणा सक्रिय झाली असून , वेगाने तपास करण्यास सुरुवात झाली आहे. म्हाडा ,आरोग्य भरती , टीईटी या सर्व घोटाळ्यांमधील आरोपीचे एकमेकांशी लागे बांधे असल्याने वेळोवेळी नवनवीन माहिती पोलिसांच्या समोर येत आहे. त्यामुळे घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.

टीईटी घोटाळ्यातील आरोपीचीही धरपकड

पुणे सायबर पोलिसांनी टीईटी घोट्याळ्यातील आणखी तीन दलालांना नुकतीच नुकतीच अटक केली आहे. संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोट्यवधीची माया गोळा करून वाटून घेतल्याचे तपासात उघड झालं आहे. नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांना अटक करण्यात आली आहे. मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय 52, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 40, रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटी प्रकरणातील आणखी आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येणार असल्याची महिती पोलिसांनी दिली आह पोलिसांनी सांगितले.

पोलीस भरतीतही घोटाळा

म्हाडा नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रीतिश देशमुखच्या चौकशीत पोलिसांनी टीईटी परीक्षेतला गैरप्रकार उघडकीस आला. आता प्रीतिश देशमुखच्या चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली होती. ते म्हणजे प्रीतिश देशमुखच्या घरात पोलीस भरतीची ओळखपत्रं सापडली होती. यामुळे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी पाठोपाठ पोलीस भरतीची परीक्षा ही संशयाच्या भोवऱ्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post