प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : महानगरपालिकेच्या मुख्य विधी अधिकारीपदी ॲड. निशा संजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आठ महिन्यांपासून या पदाची प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.मागील 12 वर्षांपासून त्या पालिकेच्या विधी विभागात कार्यरत आहेत.
मुळच्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील ॲड. निशा चव्हाण यांनी आयएलएस विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेतले असून त्यांना 1999 मध्ये वकीलीची सनद मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी 2005 पर्यंत वकीली केली. तर 2005 ते 2010 पर्यंत त्यांनी मुंबई महापालिकेत सहायक कायदा अधिकारी पदावर काम केले.
तर डिसेंबर 2010 पासून त्यांनी पुणे महापालिकेच्या विधी विभागात कनिष्ठ कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. तर 15 जून 2021 पासून ॲड. चव्हाण यांच्याकडे प्रभारी विधी अधिकारीपदाचा पदभार होता. तर शुक्रवारी झालेल्या मुख्यसभेत प्रशासनाकडून ॲड. चव्हाण यांना पदोन्नतीने मुख्य विधी अधिकारीपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. हा प्रस्ताव सर्वपक्षीय नेत्यांकडून एकमताने मंजूर करण्यात आला.