प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे: महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल अस वादग्रस्त वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. या वक्त्यावरुन महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे . राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत जोरदार निषेध करण्यात आला.
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज पुणे महानगरपालिकेत जोरदार आंदोलन करण्यात आलं. महानगरपालिकेत परवानगी नसताना देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गेटवर चढून महानगरपालिकेच्या आवारात जाऊन आंदोलन केल आहे.