या वेळी सर्वाँना कसरत करावी लागणार..
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना) शेख :
पुणे : आगामी महानगरपालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर, त्या-त्या प्रभागांमध्ये अनेक इच्छुक चेहरे आता उमेदवारीसाठी दावा करू लागले आहेत.
आजी-माजी नगरसेवक यांच्या फोटो सह आपले फोटो शिवाय महिला उमेदवार जाहीर झाली तर त्याकरिता उमेदवारांच्या पत्नी यांचे देखील फोटो आता सोशल मीडियावर प्रभागाचे नाव-नंबर टाकून झळकू लागले आहेत.दक्षिण पुणे उपनगर परिसरामध्ये प्रभाग क्र. 49 बालाजी नगर-के.के. मार्केट, प्रभाग क्र.55 धनकवडी- आंबेगाव पठार, प्रभाग क्र. 56 चैतन्यनगर-भारती विद्यापीठ, प्रभाग क्र.57 सुख सागरनगर-राजीव गांधीनगर तसेच प्रभाग क्र. 58 कात्रज-गोकुळनगर हे प्रभाग आहेत. या प्रभागातील अनेक भाग तुटून इतर प्रभागात गेल्याने काही प्रभाग लहान-मोठे झाले आहेत त्या मुळे सर्वाँना कसरत करावी लागणार आहे.
महाविकास आघाडीने प्रभाग रचना त्यांच्या पक्षांसाठी अनुकूल करून घेतली असल्याची चर्चा असली तरी प्रभागातील लोकसंख्येनुसार 100 टक्के मतदान होईल का? याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच तीनचा प्रभाग असल्याने उमेदवारी देताना पक्षांची कसरत होणार आहे तसेच अपक्ष उमेदवारांचीही मोठी डोके दुखी पक्षांसमोर असणार आहे.
ज्या नगरसेवकाचे मतदार असलेले तसेच विकासकाम केलेला भाग दुसऱ्या प्रभागात गेल्याने आम्ही येत आहोत, आपल्या सेवेसाठी.., असेही फ्लेक्स लावण्याचा मोठा खर्च वाढला आहे. तसेच, प्रभाग रचेनेनंतर एका रात्रीत त्या-त्या भागातील समाजसेवक उमेदवारीच्या 'रेस'मध्ये आले आहेत.