पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत,आरोपी दिलीप वाघमारेला अटक केली
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी ( मुन्ना) शेख :
पुणे - शहरात बेकायदेशीररित्या खासगी सावकारकीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. 65 वर्षीय अनुसया पाटोळे या महिलेने कर्जाऊ घेतलेल्या 40 हजार रुपयांवरील अवास्तव व्याजाच्या रक्कमेची परत फेड करून घेण्यासाठी सावकाराने महिलेला चक्क मंदिराबाहेर भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.पीडित महिलेकडून कर्जाचे व्याज घेण्यासाठी सावकाराने महिलेकडील एटीएम कार्ड, पासबुकही काढून घेतल्याची माहिती समोर आली आहे. सावकाराकडून घेतलेल्या पैश्याची परत फेड केली आहे. परंतु अजूनही तुझ्याकडं माझ पैसे आहेत, असे सांगत सावकार रक्कम घेत असल्याची माहिती पीडित महिलेने दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 65 वर्षीय अनुसया पाटोळे या पुणे महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी आरोपी दिलीप वाघमारे यांच्याकडून 8 लाख रुपये खासगी सावकारपद्धातीने कर्जाऊ घेतले होते. त्यानंतर घेतलेल्या कर्जाचे व्याज त्या भरत होत्या. 2017 पासून पीडित अनुसया या कर्जाचे हफ्ते भरत आहेत. मात्र तरीही अद्याप तुझे कर्ज फिटले नाही. त्यामुळं तुला व्याजाचा हफ्ता द्यावा लागेल अशी धमकी देत आरोपी वाघमारे त्यांच्याकडून पैसे घेत राहिला. इतकेच नव्हे तर पीडितेच्या खात्यात असलेले आठ लाख रुपयांची रक्कमही आरोपीने घेतली. त्यानंतर पीडितेकडून सावकाराने बँकेचे पासबुक, एटीएमही काढून घेतले. स्वतः जवळील सर्व रक्कम संपल्याने दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाल्याने पीडित महिलेने मंदिराच्या बाहेर भीक मागण्यास सुरुवात केली. मात्र तरी सावकाराने अजूनही तुझ्याकडे माझे पैसे असल्याचे सांगता तिच्याकडे पैश्याचा तगादा सुरूच ठेवलं होता.
घटना उघड झाल्यनंतर पोलिसांनी घटनेची तात्काळ दखल घेत,आरोपी दिलीप वाघमारेला अटक केली आहे. आरोपीवर महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल केला आहे. आरोपीवर खासगी सावकारकीचे गुन्हा दाखल केला आहे. खड्कपोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी या घटनेचा सखोल तपास करत आहेत.