पुणे महानगरपालिकेचे मा. आयुक्त ट्विटरद्वारे नागरिकांशी साधणार लाईव्ह संवाद !



प्रेस मीडिया ऑनलाइन :


पुणे : स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, स्वच्छतेच्या प्रक्रियेत वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांचा सहभाग वाढावा तसेच महानगरपालिकेशी संबंधित अन्य इतर विषयांवर थेट नागरिकांशी चर्चा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे मा. आयुक्त विक्रम कुमार हे स्वत: दिनांक ४ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी 3 ते 3.30 दरम्यान ट्विटरद्वारे लाईव्ह संवाद साधणार आहेत. यामध्ये नागरिकांना त्यांच्या सूचना, प्रश्न, विचारण्याची संधी मिळणार आहे. तरीही जास्तीत जास्त नागरिकांनी या चर्चेमध्ये सहभागी व्हावे. 

नागरिकांनी आपल्या सूचना किंवा मते #आयुक्तांशीचर्चा किंवा #AskPMCCommissioner हा हॅशटॅग वापरून दुपारी दोन वाजेपर्यंत ट्विट करावेत, असे पुणे महानगरपालिकेने कळविले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post