वानवडी करांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात या साठी मी सतत प्रयत्न करीत असतो . ...नगरसेवक प्रशांत जगताप



प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे शहर प्रतिनिधी : जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे : वानवडी प्रभाग हा  सर्वोत्तम प्रभाग असावा, समस्त वानवडी करांना सर्व सोयी सुविधा मिळाव्यात या साठी मी सतत प्रयत्न करीत असतो . असे राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष व नगरसेवक प्रशांत जगताप यांनी आपले मत व्यक्त केले. वानवडी प्रभागातील माने वस्ती येथे नगरसेवक प्रशांत जगताप व नगरसेविका रत्नप्रभा जगताप यांच्या  विशेष प्रयत्नातून व महानगरपालिकेच्या विकास निधीतुन ६ इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची नवीन पाईप लाईन टाकण्याचे कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

 केदारी पेट्रोल पंप चौक ते ग्रीन व्हॅली सोसायटी या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, केदारीनगर येथील मातोश्री अपार्टमेंट ते खुरपे निवास या रस्त्याचे तसेच रवि पार्क सोसायटी मागील रस्त्याचे आणि श्रीमंत महादजी शिंदे छत्री परिसरात विविध ठिकाणी कॉंक्रिटी करणाच्या कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.

 राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष व नगरसेवक प्रशांत जगताप म्हणाले की , या भागात नागरिकांच्या सहकार्याने पूर्ण झालेली व सुरू असलेली कामे पहाता वानवडीच्या विकासात मोलाची भर पडेल विश्वास वाटतो. यावेळी सिंधिया देवस्थान ट्रस्ट वानवडीचे अधिक्षक यशवंत भोसले, नगरसेविका नंदा लोणकर , प्रफुल जांभुळकर, शिवाजी शिंदे, संजय भोसले, सचिन टाळके, अमोल बाचल, महेश गायकवाड तसेच स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post