राजकिय निवडणुकीचा आखाडा तापू लागला
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी ( मुन्ना ) शेख :
पुणे : येत्या काहीच दिवसात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन पक्षातच पुणे महानगरपालिकेसाठी चुरशीची लढत होणार आहे.दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपाच्या मालिका सुरु झाल्या आहेत. त्यातच आज पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाने भारतीय जनता पक्षाची लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे.
पुणे महापालिकेतील विविध प्रकल्पांमध्ये टेंडर देण्यामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिकेच्या कामकाजात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. भारतीय जनता पक्षाने पुणे मनपातील विविध प्रकल्पांमध्ये टेंडर देण्यामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाने केला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर गेल्या ५ ते ६ महिन्यात मोठ्या बजेटचे अनेक विषय आले आहेत. त्यात कित्येक कोटींचे बजेट आले, पुन्हा सत्तेत येऊ की नाही याची शाश्वती नसल्याने मुद्दाम काही प्रकल्प कागदावर आणले जात आहेत.6 हजार कोटींच्या प्रकल्पांची चौकशी करण्याची आम्ही मागणी केलीय स्थायी समितीची मुदत काही दिवसात संपणार आहे त्यासाठी एवढी घाई चाललीय असा आरोप पुणे शहर राष्ट्रवादीने केला आहे.