पुणे शहर मुस्लिम समाज इंडियन मुस्लिम फ्रंट विविध सामाजिक संघटन यांच्या वतीने पुण्यातील आझम कॅम्पस येथे वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा सत्कार
प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
पुणे दि . २२ भारत देशात संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे. हल्ली वारंवार प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर साहेब व महापुरुषांची अवमानना होत आहे.अशा अवमानना करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात कठोर कायदा करण्यात यावा, भविष्यात महापुरुषांच्या वर टीकाटिपणी करणार्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे . या बाबतीत कठोर कायदा करण्यात यावा याकरिता वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी
एक विधेयक महाराष्ट्र राज्य विधिमंडळात मंजुरीसाठी दाखल केलेले आहे. म्हणून पुण्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने व इंडियन मुस्लिम फ्रंट तसेच विविध सामाजिक संघटन यांच्याकडून सोमवारी दिनांक 21 फेब्रुवारी रोजी पुण्यातील प्रसिद्ध आझम कॅम्पस असेंबली हॉलमध्ये सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाच्या आरंभास जमियत उलमाए हिंद पुणे शहर अध्यक्ष कारी इद्रीस साहेब यांनी कुराण पठण केले. मंचावर उपस्थित विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले. तसेच पुणे शहरात सामाजिक कार्यात सक्रिय असलेली गोरगरिबांना नेहमी मदतीचा एक हात पुढे करणारी पंजतन-पाक कमिटी चे पुणे शहर अध्यक्ष कमरूद्दिन नजीर शेख व मोहंमद शेख यांनीही त्यावेळेस प्रकाश आंबेडकर यांना पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार केले. या वेळी इस्तियाक शेख , हाजी तुफैल, वसीम अन्सारी,निझाम शाह, दानिश खान, इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा आढावा प्रेस मीडिया लाईव्ह पुणे शहर प्रतिनिधी जिलानी उर्फ मुन्ना शेख यांनी घेतला,
हा कार्यक्रम मौलाना अय्युब अश्रफी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन मुस्लिम फ्रंटच्या वतीने ठेवण्यात आला होता, या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे सलमानी जमातीचे ( नाभिक समाज) अध्यक्ष हाजी ईल्यास साहेब व इंडियन मुस्लिम फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष मुनव्वर कुरेशी साहेब यांनी आभार प्रकट केले.
पुणे शहरातील मुस्लिम समाज बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी आझम कॅम्पस या ठिकाणी उपस्थित होते.
प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली