पुणे रेल्वेस्थानकासाठी 31 कोटी आणि हडपसर रेल्वेस्थानकासाठी 21 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी: अन्वरअली शेख :
पुणे - पुणे रेल्वेस्थानकासाठी 31 कोटी आणि हडपसर रेल्वेस्थानकासाठी 21 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केलेली आहे . मागील वर्षीपेक्षा दोन्ही कामांसाठी यंदा झालेली तरतूद दुप्पट आहे . रेल्वे मार्ग विस्ताराच्या अनुषंगाने निराशाजनक बाब असली तरी देखील रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी “ बुस्टर ’ मिळाला आहे .
अर्थसंकल्पात मध्यरेल्वेसाठी केलेल्या आर्थिक तरतुदींचा उल्लेख असणारे " पिंक बुक ' गुरूवारी जाहीर झाले . यात नवीन मार्गिका , दुहेरीकरण , स्थानकांचा विकास , प्रवासी सुविधा आदींसाठी आर्थिक तरतूद केली आहे . यंदा मध्यरेल्वेने विविध योजनांसाठी 7 हजार 251 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे . मध्यरेल्वे अंतर्गत 2022-23 या वर्षातील निधीच्या तरतुदींपैकी प्रामुख्याने नव्या मार्गिकांसाठी 1 हजार 455 कोटी रुपये , दुहेरीकरण आणि तिसऱ्या , चौथ्या मार्गिकांसाठी 3 हजार 628 कोटी रुपये , पादचारी पुलांसाठी 60.67 कोटी रुपये अशी तरतूद आहे .
हडपसरला 21 कोटी रुपये ... हडपसर स्थानकाचे संपूर्ण काम 2024 पर्यंत होणे अपेक्षित आहे . पायाभूत सुविधा उभारणे वज्ञश निधी अभावी रखडले होते . यंदा हडपसर स्थानकाच्या विकासासाठी 21 कोटी रुपयांची तरतूद केली आहे . मागील वर्षी 8 कोटी रुपयांची तरतूद केली होती . यामुळे प्रवासी सुविधा उभारणे शक्य होणार आहे .
फलाट विस्तारासाठी 31 कोटी पुणे रेल्वे स्थानकावर 24 आणि 26 कोचेसची रेल्वे उभी करता यावी , या उद्देशाने पुणे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे प्रस्तावित आहे . या महत्त्वपूर्ण कामासाठी यंदा यासाठी 31 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून , मागील वर्षी 13 कोटी रुपयांची तरतूद केली होती .