पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे भेटीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने 'मोदी गो बॅक'च्या घोषणा देत आंदोलन करण्यात येणार ..

राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही भूमिका जाहीर केली 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

 पुणे : भाजपचे नेते व केंद्रातील भाजपा सरकार कडून गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करण्यात येत आहे. त्याची प्रतिक्रिया म्हणून येत्या सहा मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे भेटीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने 'मोदी गो बॅक'च्या घोषणा देत आंदोलन करण्यात येणार आहे.राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.ते म्हणाले, '' कोरोना काळातील पहिल्या लाटेचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्राचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला आहे.गेल्या काही महिन्यात भाजपा नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अवमान होईल, अशी वक्तव्ये करण्यात आली आहेत.त्या वरची प्रतिक्रिया म्हणून मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी आंदोलन करण्यात येणार आहे.

 सहा मार्चला पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रो, महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक यासह विविध योजनांचे उद्घघाटन तसेच काही कामांचा शुभारंभ होणार आहे.पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याच्यावेळी राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे. प्रशांत जगताप म्हणाले, '' महाराष्ट्र द्रोही भाजपा सरकारने दुटप्पीपणाने आजतागायत आपल्या भूमीला आणि जनतेला कमी लेखले आहे.अशा पंतप्रधान मोदींच्या निषेधार्थ सहा मार्चला सर्वांनी काळे कपडे घालून, फ्लेक्स, बॅनर लावत 'मोदी गो बॅक' घोषणा देत आंदोलनात उतरावे . येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरवातीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांचा शुभारंभ व काही विकासकामांची उद्धघाटने करत भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या तयारीत आहे.त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे या विषयावर सध्या जोरदार राजकारण सुरू झाले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post