उत्कृष्ट समाजकार्य करणारा गोरगरिबांचा कैवारी..

 अजय तायडे यांचा सदैव  मदतीचा एक हात पुढे ....


प्रेस मीडिया लाईव्ह

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

जगात देव आहे पण तो माणसाच्या रूपातच त्याचे दर्शन घडते. अशीच व्यथा सोमवार पेठेतील रहिवाशी शाहरुख सय्यद यांनी घडलेला प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती जगा समोर मांडली आहे.

शाहरुख सय्यद यांच्या मेहुणीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांना एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर त्यांच्यावर उपचारासाठी लाखो रुपये खर्च येणार असल्याचे त्यांना कळताच ते हताश झाले कारण त्यांची परिस्थिती हलाखीची होती एवढा पैसा आणायचा कोठून असा प्रश्न पडला. विजय राऊत आणि प्रशांत सर या दोघे मित्रांनी धाव घेत सांगितलं की आपल्या शहरात एक अजय तायडे नावाचा अवलिया आहे तो नक्कीच तुमची मदत करेल, अजय तायडे यांच्याशी संपर्क होताच त्यांनी तत्काळ क्षणाचाही विलंब न करता शाहरुख सय्यद यांच्या मेहुणीची मदत केली व त्यांच्या मार्गदर्शनाने दवाखण्याचा इलाज एन्जोप्लास्टी  करून आज सय्यद यांची मेहूनी सुखरूप आपल्या घरी परतली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 19 मधील माजी नगरसेवक अजय तायडे हा अवलिया नक्कीच गोरगरिबांचा कैवारी ठरला आहे


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली शेख :

Post a Comment

Previous Post Next Post