कोरोना नियम शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील...
प्रेस मीडिया लाईव्ह :
जिलानी उर्फ मुन्ना शेख :
पुणे : महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात कोरोना रूग्णांमध्ये 51 टक्क्यांनी घट झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पूर्व प्राथमिक शाळा दोन मार्च पासून सुरू होणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पालकांना वाटलं तर त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवार यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला असता . ते म्हणाले की , महाराष्ट्रासह पुण्यातील लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. तर एक मार्चपासून पुण्यातील जम्बो हॉस्पिटल बंद करण्यात येणार आहेत. याबाबत पुणे महापौरांसोबत बोलणं सुरू आहे. टास्क फोर्स आणि डॉक्टरांसोबतही चर्चा झाली आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्ण संख्या पाहता आता जम्बो हॉस्पिटलची गरज वाटत नाही. त्यामुळेच ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी होणारी रूग्णसंख्या पाहाता शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही. त्यामुळे बालवाडी पासून 12 पर्यंतचे वर्ग 2 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
"महाराष्ट्र राज्यातील कोरोना रूग्णां मध्येही आता कमालीची घट होत आहे. त्यामुळे कोरोना नियम शिथिल करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.