बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळेतच होणार
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या संदर्भात पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मार्च-एप्रिल २०२२ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा (Maharashtra board SSC HSC examination) होणार आहे. या परीक्षेच्या आयोजनासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Pune)कडून पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत बोर्डाच्या परीक्षांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बोर्डाच्या परीक्षा नियोजित वेळेतच होणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक ठरलं आहे. त्यानुसार १२ वीची परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या काळात ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात येतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत.
कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगसाठी विद्यार्थ्यांना झिगझॅग पद्धतीने बसवण्यात येणार आहे असंही शिक्षण मंडळाने सांगितलं आहे.
कोविड असल्याने यावर्षी शाळा तिथं परीक्षा केंद्र असेल. थोडक्यात आपल्याच शाळेत मुलांना परीक्षा देता येईल. १५ पेक्षा अधिक परीक्षार्थी असलेल्या शाळांना उपकेंद्र मिळेल तर १५ पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळांना जवळचे परीक्षा केंद्र मिळेल अशी माहितीही शिक्षण मंडळाने दिली आहे.
पेपर साडे दहा वाजता सुरू होईल. परीक्षार्थींना अर्धा तास वाढीव वेळ मिळेल. १०० मार्कांसाठी ३० मिनिटांचा तर ४० मार्कांसाठी १५ मिनिटांचा जादा वेळ मिळेल. यावर्षी आम्ही १५ दिवस उशिराने परीक्षा घेतोय त्यामुळे मुलांच्या मागणीनुसार आम्ही आधीच कालावधी वाढून दिला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (लेखी) बुधवार 4 मार्च 2022 पासून ते बुधवार 30 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. बारावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (लेखी) मंगळवार 15 मार्च 2022 पासून ते सोमवार 4 एप्रिल 2022 पर्यंत असणार आहे. बारावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येतील. लेखी परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी ३१ मार्च ते ९ एप्रिल २०२२ असा असेल. प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा ३१ मार्च ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून २०२२ च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.