भाजप नेत्यानं मदतीसाठी केला मनसे नेत्याला फोन

 पुन्हा एकदा मनसेकडून माणूसकीचं दर्शन झाल्याचं पहायला मिळालं. 



प्रेस मीडिया ऑनलाइन : 

जीलानी (मुन्ना) शेख : 

पुणे | राज्यात शिवसेनेनं भाजपशी असलेली युती तोडून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. त्यानंतर भाजप एकाकी पडल्याचं पहायला मिळालं. अशातच राज्यात बऱ्याच दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चा चालू आहेत.भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना आता भाजप नेता आणि मनसे नेत्याची फोन रेकाॅर्डिंग व्हायरल होत असेलेली पहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधान आलंय.

भाजपचा पुणे शहराध्यक्ष फोन उचलेना म्हणून भाजप नेत्यानं मदतीसाठी थेट मनसे नेत्याला फोन लावल्याचं ऐकायला मिळत आहे. याची काॅल रेकाॅर्डिंगही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असेलेली पहायला मिळत आहे.

छत्तीसगडमधील भाजपचे प्रदेश कोशाध्यक्ष सचिन मेघानी यांनी त्यांच्या बहिणीच्या कामासाठी थेट पुण्यातील मनसे नगराध्यक्ष वसंत मोरे यांना फोन लावला.

भाजप पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक फोन उचलत नव्हते म्हणून मी तुम्हाला फोन केल्याचं सचिन मेघानी यांनी वसंत मोेरे यांना म्हटलं. राज ठाकरेंच्या मी फाॅलोवर्समध्ये आहे. त्यामुळे मी तुम्हाला बघत असतो. पुण्याच्या मॅटर आला म्हणून मी लगेच तुम्हाला फोन केला, असंही मेघानी यांनी म्हटलं.भाजपचे पुण्यात एवढे कार्यकर्ते असूनही तुम्ही मला फोन केला म्हणजे तुम्हालाही माहितीये की मनसेच काम करु शकते, असं मोरे यांनी म्हटलं.

ज्या पार्टीचे 100 कार्यकर्ते पुण्यात आहेत ते फक्त मनसेचे दोन नगरसेवक असलेल्यांकडे मदत मागत आहेत. ऐकून चांगलं वाटलं असंही मोरेंनी यावेळी म्हटलं.ज्याचं काम आहे त्यांना माझ्या ऑफिसमध्ये पाठवून द्या, मी काम करुन देतो, असं मोरेंनी म्हटलं. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेकडून माणूसकीचं दर्शन झाल्याचं पहायला मिळालं. पक्षभेद न करता काम केल्याचं पहायला मिळालं.

Post a Comment

Previous Post Next Post