प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख
पुणे महानगरपालिका हद्दीतील शालेय पोषण आहार योजने अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळां मध्ये अजून ही खाऊ चे वाटप करण्याची अद्याप सुरुवात झालेली नाही
पुणे जिल्हा परिषदेच्या आडमुठे पणाच्या भूमिकेमुळे धान्यादी मालाचा मेनूही निश्चित करण्यात आलेला नसून सेंट्रल किचन मधील महिला बचत गट, संस्था यांना धान्यादी मालाचे वाटप करण्याबाबतचे सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
येत्या 15 मार्च पासून शिजवलेली खिचडी वाटप करायची आहे. त्यामुळे शाळांना धान्यादी माल व खिचडी यांचे एकत्र वाटप करणे शक्य नाही. धान्यादी मालाचे वाटप पूर्ण होऊन त्याची बिले मिळण्यास जिल्हा परिषदेकडून उशीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खिचडी तयार करुन ती वाटप करण्यासाठी बचत गटांकडे भांडवलही राहणार नाही. त्यामुळे धान्यादी माल वाटप करण्याबाबतचे आदेश त्वरीत मिळावे. त्यानंतर बिले महापालिका स्तरावरुन थेट शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्याचे आदेशही देण्यात यावेत, अशी मागणी सेंट्रल किचन संघाने केली आहे.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अनवरअली शेख
अन्वरअली