अखेर पुण्यात बेकायदा दुचाकी टॅक्सी वाहतूक करणाऱ्यांवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई , पंचावन्न दुचाकी जप्त

 प्रेस मीडियाचा जोरदार दणका .

प्रेस मीडियाने बेकायदेशीर दुचाकी वाहतुकीची ची बातमी लाऊन धरली होती.


प्रवाशानी देखील अशा बेकायदेशीर वाहनांचा वापर करू नये : पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे .


प्रेस मीडिया ऑनलाईन : 

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

पुणे , पिंपरी चिंचवडमध्ये बिनधास्त बेकायदा दुचाकी टॅक्सी वाहतूक करणारे चालक पोलिसांच्या रडारवर ,गेल्या काही दिवसात बाईक टॅक्सीविषयी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या . तसेच हे बेकायदेशीर असल्याचेदेखील निष्पन्न झाले . त्यामुळे अशा बाईक टॅक्सीवर कारवाई केली आहे . प्रवाशानीदेखील अशा बेकायदेशीर वाहनांचा वापर करू नये असे प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे , अजित शिंदे यांनी असे आव्हान पुण्याच्या नागरिकांना केले आहे

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून चेकायदेशीरपणे दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकींवर • आरटीओने कारवाई केली . शनिवारी केलेल्या कारवाईत ५५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत . आरटीओने केलेल्या कारवाईत आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून यात सातत्य राहणार असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले . त्यामुळे शहरात दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करता येणार नाही . जे करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे . ॲपच्या माध्यमातून पुण्यात गेल्या काही दिवसापासून बाईक टॅक्सीचा व्यवसाय सुरु होता याचा परिणाम रिक्षा व्यवसायावर झाला . प्रवासी संख्या घटू लागल्याने रिक्षा चालकांमध्ये त्रिव नाराजी तयार झाली होती . 

प्रवासी बघतोय रिक्षा वाला व अन्य काही रिक्षा संघटनांनी याचा विरोध करून आरटीओने यावर ताबडतोब करावी अशी मागणी केली . त्यानुसार सायबर पोलीस व पुणे आरटीओ यांच्यात बैठक देखील झाली . शिवाय बाईक टॅक्सीची सेवा देणाऱ्या कंपनीने देखील जो पर्यंत आम्हाला कायदेशीर मान्यता मिळणार नाही . तो पर्यंत महाराष्ट्रात सेवा देणार नसल्याचे जाहीर केले .

प्रेस मीडियाचे व पुणे जिल्हा प्रतिनिधी अनवर अली शेख यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे 



प्रेस मीडिया ऑनलाइन : 

 पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख

Post a Comment

Previous Post Next Post