2022-23ची वार्षिक निवडणूक 18 फेब्रुवारीला होणार
प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी (मुन्ना) शेख :
पुणे - करोनामुळे एक वर्षांहून अधिक काळ लांबलेल्या पुणे बार असोसिएशनच्या निवडणूकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. 2022-23ची वार्षिक निवडणूक 18 फेब्रुवारीला होणार आहे.शिवाजीनगर न्यायालयातील अशोका हॉल आणि नवीन बार रूममध्ये सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार आहे, त्याचदिवशी मतमोजणी करून रात्री निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
उमेदवारी अर्जाच्या फॉर्मची विक्री आणि स्वीकृती दि. 4 फेब्रुवारीपर्यंत सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत शिवाजीनगर न्यायालयातील पुणे बार असोसिशनच्या कार्यालयात होणार आहे. दि. 5 फेब्रुवारीला सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. दि. 7 फेब्रवारीला सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. निवडणूकीचे अंतिम चित्र दि. 8 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.
..अशी आहे अनामत रक्कम
अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला 10 हजार रुपये, उपाध्यक्ष पदासाठी 8 हजार रुपये, सचिव पदाकरीता 5 हजार रुपये, खजिनदार पदाकरीता 4 हजार रुपये, हिशेब तपासणीस पदाकरीता तीन हजार रुपये, कार्यकारिणी सभासद पदाकरीता 2 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार असून ही रक्कम विना परताव्याची आहे. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सतीश मुळीक यांनी याबाबतची माहिती दिली.
..अशी आहे अनामत रक्कम
दि. 8 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजता पुणे बार असोसिएशनच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. दि. 14 फेब्रुवारीला दुपारी 4:00 वाजता अशोका हॉल येथे उमेदवार आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. मतमोजणी आणि निकाल दि. 18 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणूकीसाठी प्रमुख निवडणूक अधिकारी म्हणून पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक संकपाळ काम पाहत आहेत. अतिरिक्त निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अजय पटवर्धन, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. फक्कडराव साकोरे, ॲड. मंगेश लेंडघर, ॲड. नमिता पाटील, ॲड. पूनम स्वामी, ॲड. पूजा भोसले यांची काम पाहत आहेत.