ओला, उबर, रॅपिडो विरोधात पुणे शहरात रिक्षचालकांचा जोरदार आंदोलन
आम्ही रिक्षा चालवल्या शिवाय आमच्या घरात चूल पेटत नाही परंतु बेकायदा दुचाकी प्रवासी वाहतुकीमुळे रिक्षा चालून सुद्धा एक वेळचे पोट भरण अवघड झाले आहे.
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली
पुणे, पिंपरी चिंचवड शहारा मध्ये बेकायदा दुचाकी टॅक्सी वाहतूक कंपनी वर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या ॲप मधून दुचाकी टॅक्सी प्रवासी वाहतूक ऑप्शन ॲप मधून काढून टाकावा व महाराष्ट्र राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करावी या साठी गेली दोन दिवस बघतोय रिक्षावाला या संघटनेच्या वतीने व शहरातील रिक्षचालकांनी पुणे आरटीओ कार्यालय समोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
बघतोय रिक्षावाला या संघटनेच्या अध्यक्ष मा . केशव सिरसगार यांनी जो पर्यंत मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत अमरण उपोषण पुकारले आहे.मागील काही महिन्यांपासून रिक्षचालकांनी विविध आंदोलने केली तरी संबंधित असलेल्या, ओला, उबर, आणि रॅपिडो या बेकायदेशीर दुचाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनी ॲप वर कुठलीच कारवाई करताना सरकारी यंत्रणा दिसत नाहीत म्हणून नाईलाजाने रिक्षावाले आरटीओ कार्यालय समोर बेमुदत संपावर गेले आहेत .
अशी माहिती रिक्षचालकांनी प्रेस मीडिया लाईव्ह शी बोलताना सांगितलं, आज दोन दिवस झाले आम्ही रिक्षावाले आंदोलन सुरू केले आहे. आमच्या घरात आम्ही दररोज कमवल्या शिवाय चूल पेटत नाही तरी देखील आम्ही रिक्षावाले आंदोलन करत आहोत कारण आता दररोज रिक्षा चालऊन सुद्धा पोट भरणार नाही. अशी परस्थिती सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे निर्माण झालेली आहे .
विनापरवाना बेकायदेशीर दुचाकी टॅक्सी वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे तरीपण ज्या ओला उबर आणि रॅपिडो सारख्या कंपन्या वाहतूक ॲप मध्ये बेकायदा दुचाकी प्रवासी वाहतूक ऑप्शन बंद व्हावा म्हणून सरकार काहीच पाऊल उचलत नाही, शासनाचे धोरण गरीब रिक्षावाल्यांना डावलून श्रीमंत ॲप कंपन्यांना अभय देण्याचा दिसत आहे..?
पुणे शहरात व जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येने रिक्षा आहेत जर सरकारने बेकायदा दुचाकी वाहतूक ओला, उबर, रॅपिडो सारख्या वाहतूक कंपन्यांवर कारवाई केली नाही तरी नक्कीच येणाऱ्या आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होईल अशी प्रतिक्रिया रिक्षावाल्यांची माई यांनी बोलताना दिली.
रिक्षावाले शासनाच्या कायद्याप्रमाणे रिक्षा शहर परवाना, थ्री व्हीलर प्रवासी वाहतूक लायसन ,बॅच बिल्ला, टॅक्स इन्शुरन्स ,मीटर पासिंग, रिक्षा पासिंग ,रिक्षा फिटनेस, रिक्षा पीयूसी, परमिट रेंनुवल आदि सगळे यासंबंधी कायद्याप्रमाणे आहेत तरी पण त्यांनाच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि बेकायदा दुचाकी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपनी ॲप धारकांना कुठलाच कायदा न पाळता बिनधास्त व्यवसाय करत आहे. त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही .का ? असा प्रश्न रिक्षाचालक उपस्थित करत आहे. म्हणून रिक्षाचालक सरकारच्या या धोरणाशी नाराजी व्यक्त करत आहेत.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख: