रिक्षाचालकांचा पुणे विभागीय आयुक्तलय ते पुणे RTO विराट मोर्चा. 4 हजार रिक्षाचालक सहभागी..
एक महिना झाला तरी प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीही केले नाही
प्रेस मीडिया ऑनलाईन
पुणे जिल्हा प्रतिनिधि : अन्वरअली शेख :
पुणे ,पिंपरी चिंचवड मध्ये बिनधास्त बेकायदा दुचाकी टॅक्सी वाहतूक करणाऱ्या कंपनी ॲप वर बंदी घालावी या साठी रिक्षचालकांनी आंदोलन केले. 4 फेब्रुवारी 22 सकाळी 11 वाजता विधानभवन येथे निदर्शने करून डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालकांनी पुणे RTO पर्यंत भव्य मोर्चा काढला. व पुणे RTO येथे सुद्धा निदर्शने केली.
मुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बेकायदा बाईक टॅक्सी 8 दिवसात बंद करण्याचे आश्वासन डॉ. केशव नाना क्षीरसागर यांना बघतोय रिक्षावाला च्या 4 जानेवारी 22 च्या विशाल मोर्च्यानंतर दिले होते. या गोष्टीला आता एक महिना झाला तरी प्रशासनाने कागदी घोडे नाचवण्याशिवाय काहीही केले नाही. व प्रत्यक्षात बेकायदा बाईक टॅक्सी जोरात सुरू आहेत.
त्यामुळे आधी *दादा मला वाचवा* असे आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालकांनी आता *दादा क्या हुवा वो वादा ?* असे आंदोलन सुरू केले असून, प्रशासनाला बेकायदा बाईक टॅक्सी ला का अभय देत आहेत याबद्दल जाब विचारला आहे. तसेच सरकारचा निषेध म्हणून हातावर व डोक्यावर "दादा क्या हुवा वो वादा" आणि "मेरा सरकार चोर है" असा तात्पुरता टॅटू हजारो रिक्षाचालकांनी बनवला आहे.