प्रेस मीडिया ऑनलाइन :
जीलानी ( मुन्ना) शेख :
पुणे- करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये केले होते. मात्र, आता दि. 1 फेब्रुवारी पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपये करण्यात येणार आहे.करोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्यभरात निर्बंध देखील लागू केले होते.
स्थानकावरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटाच्या रकमेत वाढ केली होती. या सह केवळ वृद्ध, दिव्यांग, रुग्ण, गरोदर महिला आदींसह मदतीची गरज असणाऱ्या व्यक्तींनाच प्लॅटफॉर्म तिकीटे देण्यात येत होते. सध्याच्या कोविड स्थितीचा आढावा घेऊन पुणे रेल्वे विभागाने पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म तिकीटाच्या दरात बदल केला आहे. दि. 1 फेब्रुवारी पासून पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी 10 रुपये आकारण्यात येणार असून, पूर्वीप्रमाणे सर्वांना तिकीट खरेदी करता येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.