केवळ गरिबांवर बळाचा वापर तर धनदांडगे मोकाट.
प्रेस मीडिया ऑनलाईन
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख
देहूरोड शहराच्या कृष्णानगर वार्ड क्रमांक चार या भागामध्ये कॅंटोन्मेंट बोर्डाने अतिक्रमणाची कारवाई करण्यासाठी आज सकाळी १०:३० वाजता कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अतिक्रमण हटाव पथक आणि पोलिस फौज फाटा त्या ठिकाणी दाखल झाला असता सर्वप्रथम स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्याठिकाणी माजी नगरसेवक गोपाळराव तंत्ररपाळे दाखल झाले व अधिकाऱ्यांना जाब विचारला की तुम्ही कसलीही पूर्व सूचना न देता कसे काय या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी दाखल झाला आहात..?
या ठिकाणी टपऱ्या किंवा दुकाने नाहीये जर अतिक्रमणच काढायचे तर संपूर्ण देहूरोड शहरांमध्ये ठीकठिकाणी अतिक्रमणाचा सुळसुळाट वाढला आहे अगोदर तो काढण्याचे काम करा फक्त वार्ड क्रमांक चार मध्येच गरिबांवर बळाचा वापर का असाही प्रश्न ? माजी नगरसेवक गोपाळराव तंतरपाळे यांनी उपस्थित केला. कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचे विरोधा मध्ये घोषणाबाजी सुद्धा केली. देहूरोड पोलीस ठाण्याच्या मुख्य निरीक्षक मॅडम वर्षाराणी पाटील यांनी समजूत काढत त्या ठिकाणी नागरिकांनाच आपापले किरकोळ जे अतिक्रमण होते ते काढण्यासाठी सांगत नागरिकांचा व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकारी यांच्यातला वाद मिटवला. शहरातले नवीन व मोठ मोठे अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पथकाने केवळ गरिबांच्या-च वर कारवाईचा बळ वापरायचा व धनदांडग्यांना मोकाट सोडायचे अशी परिस्थिती आहे. या बाबत नागरिकांकडून संतापाची लाट उसळली आहे.