नरेश कोळंबे : कर्जत
इंटेग्रन मॅनेज्ड साॅल्युशन्स मुंबई व ज्ञानकमल शिक्षण संस्था,वांगणी यांचे संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील रा.जि.प.शाळा व खासगी माध्यमिक शाळांमधे मोफतसंगणक संच वाटपाचा दुसर्या टप्प्यातील कंपनी व ज्ञानकमल शिक्षण संस्था यांच्या नियमीत उपक्रमातील कार्यक्रम संपन्न झाला. कर्जत व परिसरातील अनेक शाळांना संगणक भेट देत शाळांना तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी वरील दात्यांनी अथक मेहनत घेतली . भडवल, नेवाळी, ममदापूर, देऊळ वाडी, आथ्रंट, सुगवे,मार्गाची वाडी,बीड अश्या अनेक सरकारी व खाजगी शाळांना यावेळी संगणकाची भेट देण्यात आली.
यावेळी इंटेग्रन मॅनेज्ड साॅल्युशन्स चे अध्यक्ष संजीव जैन, ज्ञानकमल शिक्षण संस्था अध्यक्ष प्रा.मनिषा बैकर, ज्ञानकमल शिक्षण संस्था सचिव मा.नामदेव बैकर, रा.जि.प.आदर्श शिक्षक एन.डी.म्हात्रे या मान्यवरांचे उस्फूर्त स्वागत रा.जि.प.शाळा भडवळ येथे मुख्याध्यापक गणेश ठाकूर सर व त्यांचे सहकारी, तसेच जि.प.शाळा ममदापुर येथे गायकवाड सर , जि प.शाळा नेवाळी येथे चंबावणे मॅडम व त्यांचे सहकारी, देउळवाडी येथे मुख्याध्यापक थोरात सर , रा.जि प.शाळा आथ्रंट वरेडी येथे मुख्याध्यापक मा.म्हात्रे सर व त्यांचे सहकारी, जि.प शाळा सुगवे व पिएनपी माध्यमिक शाळा सुगवे येथे मुख्याध्यापक खैरे सर, कडव सर यांचे सहकारी मार्गाची वाडी येथे लक्ष्मण संगपवाड सर ,पीएनपी माध्यमिक शाळा जांबरूख येथे पिंगळे सर व त्यांचे सर्व सहकारी, पीएनपी माध्यमिक विद्यालय बीड येथे मुख्याध्यापक गाडेकर व पिंगळे सर यांनी केले. याप्रसंगी श्री.एन.डी.म्हात्रे सर यांनी ग्रामीण क्रिकेट खेळाबद्दल वास्तव सर्वासमोर मांडून मा.संजीव जैन यांचे कार्य एखाद्या मंत्री,आमदार, खासदारांपेक्षाही मोठे आहे असे सांगून जैन सरांच्या कार्याचा गौरव केला. प्रा.मनिषा बैकर यांनी इंटेग्रन मॅनेज्ड साॅल्युशन्स कंपनीच्या सी एस आर अंतर्गत व आपल्या वैयक्तिक दातृत्वतुन मा.संजीव जैन हे राबवित असलेल्या उपक्रमाबाबत व सामाजिक योगदानाबद्दल उपस्थितांना माहीती देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. नामदेव बैकर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना ज्ञान संपादन करण्याचे आवाहन करून संजीव जैन सर यांचे संगणक संच उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्जत तालुक्यातील शाळांच्या वतीने ज्ञानकमल शिक्षण संस्थेच्या वतीने जैन सरांचे आभार व्यक्त केले.
या वेळी सर्वांचे आकर्षण असणारे मा.संजीव जैन सर यांनी कर्जत तालुक्यातील एकही शाळा संगणकापासुन वंचित राहणार नाही असे सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने संगणक शिक्षणाची गरज आहे आणि हे संगणक संच सरकारी यंत्रणा व समाजीतील इतर घटकांकडून उपलब्ध होणार नाही यासाठी इंटेग्रन मॅनेज्ड साॅल्युशन्स च्या माध्यमातून ज्ञानकमल शिक्षण संस्था सहकार्याने मी जेवढे शक्य होईल तेवढे संगणक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. कर्जत तालुक्यात ज्ञानकमल शिक्षण संस्था राबवित असलेल्या उपक्रमाबाबत तसेच संस्थेच्या कार्याबाबत संजीव जैन यांनी गौरवोद्गार काढले.