यांचा येत्या १५,वा १६ तारखीला उर्स साजरा करण्यात येणार...
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख
देहूरोड परिसरातील प्रख्यात दर्गा हजरत हाजी अब्दुल रहमान मलंग शाह उर्फ मलंग बाबा मुंबई बेंगलोर महामार्गावर देहूरोड इंद्रा नगर या ठिकाणी एका छोट्याशा डोंगर कड्यावर अतिशय सुंदर, व देखण्या,ठिकाणी मनाला आनंद मिळतो अशा निसर्गाच्या कुशीत हा दर्गा अस्तित्वात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार येणारे 15 फेब्रुवारी या तारखेला दर्ग्या शरीफ चा संदल आणि 16 फेब्रुवारी 2022 रोजी ऊर्स व लंगर अर्थात् अन्नदान होणार आहे,दरवर्षी या ठिकाणी दर्शन ऊर्स मध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते, दरवर्षी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन, संदल, उर्स , ( लंगर )प्रसादाची व्यवस्था दर्ग्याच्या विश्वस्थान कडून व लोक वर्गणीच्या माध्यमातून केली जाते.
एका मुलाखती दरम्यान प्रेस मीडिया पुणे जिल्हा प्रतिनिधी यांना दर्ग्याचे विश्वास्त मोहम्मद नबी सुलेमान शेख यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या दर्ग्या विषयी अनेक आठवणी सांगितल्या, त्यांच्या लहानपणापासून त्यांनी बघितले आहे की त्यांचे आजोबा ह्या दर्ग्याची सेवा करत होते, आता मी व माझ्या बरोबर सर्व वस्ती मधले तरुण व लहानगी मुले ही दर्ग्याची सेवा देखभाल करण्यासाठी व कार्यक्रमास उपस्थित राहतात , दररोज वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक दर्ग्याच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात,अगदी सुंदर अशी माहिती दिली.
यावेळी असलम मोहम्मद शेख, अब्दुर रहमान सुलेमान शेख, अशोक साकम, आकाश कुसळे, उपस्थित होते
देहूरोड शहराच्या पश्चिमेस मुंबई बेंगलोर महामार्गावर कात्रज बायपास हायवे लगत डोंगर कड्यावर अति मनमोहक व मनाला शांती समाधान प्राप्त होईल अशा शांत वातावरणात मलंग बाबा यांचा दर्गा शरीफ कित्येक वर्षापासून आहे.