चिंचवड रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा थांबणार...

 पासची सुविधा ही पुन्हा सुरू होणार : खासदार श्रीरंग बारणे


प्रेस मीडिया ऑनलाइन :

 पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

पिंपरी चिंचवड मतदारसंघातील मावळ लोकसभा चिंचवड आणि कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्यांच्या काही गाड्यांचा थांबा पुन्हा सुरु होणार आहे . तसेच पुणे-मुंबई -पुणे दरम्यान प्रवास करणा-या नागरिकांसाठी महिना , तीन महिन्याचा पास मिळण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध होणार आहे.अशी माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली . रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्याचे बारणे यांनी सांगितले .

चिंचवड , कर्जत स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुन्हा थांबा देण्याबाबत आणि पासची सुविधा सुरु करण्यासाठी खासदार बारणे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली . नागरिकांना येणा - या अडचणी त्यांना सांगितल्या .दक्षिण भारतातून येणाऱ्या चेन्नई , कोणार्क , कन्याकुमारी , महालक्ष्मी , सिंहगड , अहिंसा , कोल्हापूर , सह्याद्री , डेक्कन एक्सप्रेस अशा १८ रेल्वे गाड्यांनी कर्जत , चिंचवड स्थानकावरील थांबा बंद केला आहे .

 १ डिसेंबरपासून सुरु झालेल्या इंटरसिटी एक्सप्रेसचाही कर्जत येथील थांबा बंद आहे . पूर्वी इंटरसिटी कर्जत स्थानकावर थांबत होती . पण , आता थांबा बंद केल्याने कर्जत , कल्याण मधील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे . चिंचवड , कर्जत स्थानकावर जास्तीत जास्त गाड्यांना थांबा देण्याची नागरिकांची मागणी आहे . नागरिकांच्या सोईसाठी चिंचवड , कर्जत रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे सर्व गाड्यांना थांबा देण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली . तसेच पासची सुविधा पुन्हा उपलब्ध करण्याची मागणी केली . चिंचवड स्थानकावर गाड्या थांबत नाही म्हणून नागरिकांची तारांबळ होत आहे, या सर्व बाबी लक्षात घेऊन मावळ  मतदारसंघातील खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.


 प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी :  पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post