भाजप नगरसेवक वसंत बोरटे यांचा राजीनामा..
राजकिय वर्तुळात खळबळ
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी पठाण एम एस:
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक जवळ आली असता भाजपाला भोसरीत पहिला जोरदार धक्का बसला आहे. शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकाने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक २ मोशी जाधव वाडी या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नगरसेवक वसंत बोराटे यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे त्यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. प्रभागाच्या विकासासाठी सहकार्य केले नाही व पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता, असे सांगत नगरसेवक वसंत बोराटे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सोपवला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोर का झटका बसला असून या मुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे...