मोशी आणि परिसरात राष्ट्रवादी मध्ये उभी फूट पडणार



प्रेस मीडिया लाईव्ह :

अनवरअली शेख :

पिंपरी चिंचवड : भाजपातील नाराज नगरसेवक वसंत बोराटे यांनी निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन  दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.त्या मुळे मोशी आणि परिसरात राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडणार आहे. संभाव्य इच्छुकांचा निवडणुकीत पत्ता कट होणार असून, महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसणार आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादीच्या तिकीटावर विद्यमान महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, घनश्याम जाधव वसंत बनकर आणि शुभांगी जाधव यांनी निवडणूक लढवली आहे. त्यांना अनुक्रमे ५ हजार ८४३, ३ हजार १२, ५ हजार ५४९ आणि ३ हजार ८३९अशी मते पडली आहे.

तसेच, शिवसेनेच्या तिकीटावर रुपाली आल्हाट, प्रतिभा जाधव, अंकुश जाधव, सचिन ठाकूर यांनी निवडणूक लढवली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांना अनुक्रमे ८ हजार २८६, ५ हजार १८, ४ हजार ८७३ आणि २ हजार ९७० मते मिळाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रिक मतदानाची आकडेवारी लक्षात घेता भाजपा आणि शिवसेना-राष्ट्रवादीची ताकद तुल्यबळ आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित ढल्यास नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले वसंत बोराटे, महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, विशाल जाधव, विशाल आहेर यांच्यासह आतिष बारणे, राहुल बनकर आदी मंडळी राष्ट्रवादीकडून इच्छुक राहणार आहेत. तसेच, शिवसेनेकडून परशुराम आल्हाट, अंकूश जाधव, सचिन ठाकूर अशी मंडळी तीव्र इच्छुक आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढल्यास एकूण सहाजण इच्छुक आहेत. त्यातच भाजपाच्या विद्यमान नगरसेविका अश्विनी जाधव यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित मानला जात आहे.

सेना-राष्ट्रवादी एकत्रित लढल्यास मतांचे विभाजन होणार नाही. पण, स्वतंत्रपणे लढल्यास मतांचे विभाजन निश्चित आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीतून पाच ते सहा उमेदवार इच्छुक असल्यामुळे राष्ट्रवादीतही बंडखोरीची शक्यता आहे. विशेष म्हणजे, भाजपा नगरसेविका अश्विनी जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून निवडणुकची तयारी करणाऱ्यांचा पत्ता कट होणार आहे.

नुकतेच राष्ट्रवादीवासी झालेले वसंत बोराटे यांनी आगामी निवडणुकीसाठी रुपाली आल्हाट, अश्विनी जाधव आणि स्वत: असे तीन सदस्सीय पॅनेल निश्चित केले आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे कविता आल्हाट यांचे तिकीट कापण्यात येणार असून, त्यासाठीच त्यांना महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, आल्हाट आणि टीमने निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने कामाला सुरूवात केली आहे. परिणामी, आल्हाट यांच्या नाराजीचा सामना राष्ट्रवादीला करावा लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post