मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांनी दिलेला शब्द पाळला.
प्रेस मीडिया ऑनलाईन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
वडगाव मावळ तालुक्यातील साळुंब्रे येथील पावना नदीवर पुलाच्या कामाचे दिनांक ०८/०२/२०२२ रोजी ११ वाजता आमदार सूनील शेळके यांचे हस्ते भूमीपूजन करण्यात आले. सहा महिन्यात बांधकाम पूर्ण होईल असे सांगण्यात आले. 2017 या साली आमदार सुनिल अण्णा शेळके साळुंब्रे या ठिकाणी काकडा आरती साठी गेले असता ग्रामस्थांनी त्यांच्या लक्षात आणून दिले की या ठिकाणी नदीवरील जुन्या पद्धतीचा बांध आहे आणि तो पूर्ण पणे खचलेला आहे.नदी ओलांडायला ग्रामस्थांना व शाळकरी मुलांना याचा फारच त्रास होत आहे. त्या वेळी आमदार यांनी या ठिकाणी पाहणी करून पूल बांधण्याचा शब्द दिला होता तो शब्द पाळत काल पुलाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
साळुंब्रे गावचे माजी आदर्श सरपंच धनंजय विधाटे यांनी या ठिकाणी आलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच या करिता विशेष पाठपुरावा करण्यासाठी गावचे युवा ऊद्योजक श्री. दिलीप दादा राक्षे, श्री. निलेश राजाराम राक्षे , सि.ए. अविनाश सुरेश गायकवाड, श्री. श्रीनिवास राक्षे, श्री. समीर सुरेश राक्षे, श्री. संतोष गुलाबराव राक्षे , श्री. सुहास विधाटे, श्री. राहुल दिनकर विधाटे , श्री. सतीश नारायण राक्षे यांनी फार परिश्रम घेतले ...
प्रेस मीडिया लाईव्ह
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस