पालकमंत्र्यांच्या मागणीला प्रशासनाने दाखवली केराची टोपली.....महापौर माई ढोरे

 


प्रेस मीडिया ऑनलाइन : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :

पिंपरी -पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने गेल्या महिन्यापूर्वी शास्ती कर वगळून मूळ कर घेण्यात येईल अशी बतावणी केली होती. परंतु प्रत्यक्षात महिना झाला तरीही प्रशासनाकडून नागरिकांना शास्तीकर भरण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे.त्यामुळे पालक मंत्र्यांच्या मागणीला देखील प्रशासनाने केराची टोपली दाखवली असल्याची टीका महापौर माई ढोरे यांनी शुक्रवारी (दि. 11) केली.

महापौर ढोरे म्हणाले, सन 2008 मध्ये राष्ट्रवादीची सत्ता असताना शास्तीकराचा बोजा नागरिकांच्या मानगुटीवर टाकण्यात आला. राष्ट्रवादीची नेतेमंडळी निवडणूक तोंडावर आलेली असताना नागरिकांच्या भावनेशी खेळत आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पालकमंत्र्यांच्या नावाने शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर घेण्यात येईल, अशी बतावणी राष्ट्रवादी पक्षाच्या नेतेमंडळींकडून करण्यात आली.

पण महिना झाला तरीही प्रशासनाकडून पालकमंत्र्यांच्या मागणीची प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही. तसेच राष्ट्रवादी पक्षाकडून जनतेची वेळोवेळी दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली असल्याची टीका महापौर ढोरे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post