सुविधा अ परिमंडळ अधिकारी दिणेश तावरे
परिमंडल कार्यालय अ व ज विभाग निगडी येथे एकूण 144 दिव्यांग व्यक्तींना अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले.
प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील परिमंडळ कार्यालयांतर्गत ( राशन कार्ड ऑफिस) आयएसओ 9001 2015 चे मानांकन प्राप्त करण्याबाबत कामकाज सुरु आहे. यामध्ये शिधापत्रिकेच्या कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना टोकन देन्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळणार आहे .या टोकण वितरण प्रणालीचा प्रारंभ अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
या उपक्रमाला राबवण्यासाठी परिश्रम, धावपळ करणारे परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे व त्यांचे सहकारी, कर्मचारी मंडळ यावेळी उपस्थित होते. शिधापत्रिका कार्यालयाचे नुतनीकरण तसेच बँके प्रमाणे टोकन प्रणालीमध्ये सुरु असलेले शिधापत्रिकेचे कामकाज, शिधापत्रिकाधारक / अर्जदार कार्यालयात आल्यानंतर त्यांच्या नावाचे टोकन रजिस्टरमध्ये नोंद केली जाणारी . तसेच विविध प्रकारचे मार्गदर्शन फलक लावण्यात आले आहेत . लिपीक लाऊड स्पिकरद्वारे टोकन क्रमांकाचा पुकारा करून संबंधित शिधापत्रिकाधारक / अर्जदार यांना कार्यालयातील खिडकीवर बोलाविले जानार , आदी कामकाजामुळे कार्यालयात गर्दीचे प्रमाण कमी होत आहे. व कामात पारदर्शकता दिसून येत आहे. नागरिकांना कामात सुविधाही प्राप्त होत आहे. शिधापत्रिकाधारक / अर्जदार यांना कार्यालयात ,बसण्याची उत्तम व्यवस्था , पिण्याचे शुद्ध पाणी , प्रसाधन गृह , तक्रार पेटी , प्रथमोपचार आदी व्यवस्था पाहून ढोले यांनी समाधान व्यक्त केले. आजच्या काळातील सुसज्ज कार्यालय येणाऱ्या अर्जदार नागरिकांसाठी सुविधा पूर्वक व्यवस्था करण्यात आली आहे, प्रेस मीडिया लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी अन्वरअली यांनी आढावा घेतला.
परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना शिधापत्रिकेच्या (राशन कार्ड ) कामकाजामध्ये कुठलीही अडचण येऊ नये व सर्व मूलभूत सुविधा नागरिकांना मिळाव्या, या करीता विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त पुरवठा पुणे विभाग यांनी पुरवठा शाखेला आयएसओ 9001- 2015 मानांकन मिळण्यासाठी वेळोवेळी बैठक घेऊन सर्व अधिकारी कर्मचारी यांना सूचना व मार्गदर्शन केले होते, त्यानुसार निगडी येथील अ व ज परिमंडळ कार्यालयात आयएसओ 9001- 2015 चे मानांकन प्राप्त करण्याबाबत कामकाज युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले आहे ,
यामध्ये कार्यालयाची रंगरंगोटी अभिलेखाचे अद्यावतीकरण, सूचना फलक , अर्जदार व नागरिकांना मार्गदर्शक सूचना फलक, बसण्याची व्यवस्था, टोकण पद्धतीने कामे करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे, कार्यालयात आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इत्यादी कामे पूर्ण करण्यात आलेली आहे. या कामकाजाची पाहणी करण्यासाठी अन्नधान्य वितरण अधिकारी तथा उपजिल्हा अधिकारी सचिन ढोले यांनी गुरुवारी परिमंडळ कार्यालय विभागास भेट दिली व पाहणी करून परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे व कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.