नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची वेळ वाचणार ...

 मिळकत कर थकबाकी नसलेला दाखला ऑनलाइन..

प्रेस मीडिया ऑनलाईन :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :

पिंपरी चिंचवड नागरिकांना महापालिकेच्या कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची वेळ आता वाचणार आहे .महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या १६ विभागीय कार्यालयांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या . त्यांची दखल घेत कर संकलन विभागाकडून मिळकत कर थकबाकी नसलेला दाखला ऑनलाइन देण्यास सुरुवात केलीली आहे . 

नागरिकांची गैरसोय व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी कर संकलन विभागाने महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे . त्यामुळे नागरिकांना घरबसल्या हा दाखला मिळणार आहे . तसेच , इतर योजना व सेवा ऑनलाइन माध्यमातून देण्याचे नियोजन आहे , असे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले .

 तसेच अनधिकृत बांधकामे गुंठेवारीच्या माध्यमातून नियमितीकरण केले जात आहे . त्यासाठी थकबाकी नसलेला दाखला अत्यावश्यक आहे . या योजनेची मुदत २१ फेब्रुवारीला संपत आहे . नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा शुल्क वसूल केले जात आहे . त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत . त्यांची दखल घेऊन प्रशासनाने ऑनलाईन दाखला देण्याचा निर्णय घेतला आहे . 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post