भाजपला धक्का देत वसंत बोराटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश

 


प्रेस मीडिया लाईव्ह

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

पिंपरी चिंचवड शहरात भोसरी परिसरातील भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी कालच आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला प्रभागातील विकासकामे करण्यास वरिष्ठांच्या मुळे अडचण येत असल्याने आपण नगरसेवक पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण देत नगरसेवक वसंत बोराटे यांनी सांगितले. 

 बुधवारी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेले वसंत बोराटे यांनी गुरुवारी दि १७ रोजी सकाळी मुंबईत राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष झाल्यानंतर भोसरी मधूनच त्यांनी भाजपला पहिला धक्का दिला आहे. प्रभाग क्रमांक दोन मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले वसंत बोराटे यांनी बुधवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्या. त्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता होती. 

वसंत बोराटे हे भाजप आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांचे समर्थक मानले जातात काल आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी नगरसेवक वसंत बोराटे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे , महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट , कार्य अध्यक्ष , नगरसेवक , माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल , उपस्थित होते .


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :  पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post