नदीपात्रात जनावरांची चरबी प्रशासन झोपेत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आंदोलनाचा इशारा..
प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न वारंवार होत आहे, याला जवाबदार कौन ??
या बंधाऱ्यातील पाणी पिंपरी,चिंचवडरांसाठी पिण्यास वापरात येत आहे. कोरोना व दुसऱ्या रोगराई पसरत आहेत, साथींच्या रोगाचा फैलाव होत असताना, जनावरांची चरबी मिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर या पाण्याचे दुष्परिणाम होण्याची संभावना नाकारू शकत नाही हे प्रकार लोकांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे .
मागील काही महिन्यापूर्वी ही असे प्रकार घडले होते. प्रशासनाने त्यावेळी तात्पुरती साफसफाई आणि राखण ठेवून आपली जबाबदारी पूर्ण झाली आहे असे दर्शवले होते, परंतु कायमस्वरूपी उपाय न केल्या गेल्यामुळे पाण्याला दूषित करण्याची घटना पुं. पुन्हा घडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे ,आणि यापुढे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात नाही तर आंदोलनाचा इशाराही स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांनी दिला आहे,
प्रेस मीडिया लाईव्ह चे पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी पठाण यांनी आढावा घेतला असता नागरिकांनी सांगितले की या ठिकाणी छुपे कॅमेरे लावण्यात यावे व स्पेशल फॉर्स गस्त घालण्यासाठी तैनात करण्यात यावी, आजूबाजूच्या परिसरातील मास व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पाळीत ठेवण्यात यावी, आरोग्य विभागाने या चरबीचा नमुना टेस्टिंग साठी पाठवावा व तो कुठल्या जनावराचा आहे याबाबत माहिती मिळवावी व त्या आधारे गुन्हेगारांपर्यंत पोहोचणं सोप्प होईल, जनावरांची चरबी पिण्याच्या पाण्याच्या बंधाऱ्यामध्ये टाकने हे अति गंभीर बाब आहे यावर तत्काळ दखल घेणे गरजेचे आहे .नाहीतर भविष्यात या दूषित पाण्यामुळे गंभीर आजार व रोगराई पसरण्याचे प्रकार पिंपरी-चिंचवड मध्ये घडू शकतात.तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार ? आरोग्य विभागाने तत्काळ याची दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.