प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड : ( प्रतिनिधी ) : देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या राष्ट्रवादीच्या पूजा दिवटे यांनी गुरुवारी (दि.10) दुपारी अर्ज माघार घेतले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये स्मिता शैलेश चव्हाण यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड होणार आहे.
देहू नगरपंचायतीच्या अनुसूचित जाती महिला आरक्षण पदाच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या प्रभाग क्र. 9 मधील स्मिता चव्हाण आणि प्रभाग 3 मधील पूजा अमोल दिवटे यांनी नामनिर्देशन दाखल केले होते. गुरुवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत माघार घेण्याचे अंतिम दिवशी दिवटे यांनी अर्ज माघार घेतल्याने चव्हाण यांचा एकमेव अर्ज राहिला आहे. त्यामुळे चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर होईल.
नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर त्वरित उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 11) सकाळी 10 ते 12 या वेळेत नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. त्यानंतर त्वरित 15 मिनिटांनी अर्ज माघार घेण्याची वेळ असल्याने उपाध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. उपाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे.