जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे.
प्रेस मीडिया ऑनलाईन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजले एकीकडे इच्छुकांची धावपळ कार्यकर्त्यांची किलबिलाट त्या निमित्त पिंपरी चिंचवड शहरात राजकीय वातावरण काही काळासाठी तरी तापणार आहे.
तर दुसरीकडे नागरिकही जागरूक होताना दिसत आहे, सोशल मीडिया इतिहास घडवणार नागरिकांच्या जागृतीसाठी, एकमेकांना पोस्ट होऊ लागले जागते रहो निवडणूक आली, भरपूर ऐकली भाषणे कधीच पूर्ण होत नाही आश्वासने, इकडूनआले तिकडून आले कधीच नाही दिसणारे सगळे गोळा झाले, वार्ड बदलले प्रभाग बदलले रचना बदलली परंतु समस्या त्याच मतदार राजा जागा हो, जागरूक मतदार तूच आहे तुझ्या प्रभागाचा शिल्पकार, जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. सज्जनांची सक्रियता समाजात वाढली पाहिजे.लोकशाहीची उभारणी लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्या जनतेच्या जागृत व संघटित शक्तीच्या आधारे झाली पाहिजे,
जनता लोकशाहीविषयी उदासीन असेल, तर लोकशाही कोसळते. हा राजकारणातला साधा वस्तुवाद आहे.लोकशाहीचा खरा आधार जनता असते. जनतेच्या जागृती तून प्रगतिशील राष्ट्र उभा राहतो,लोकशाही राष्ट्र व जनता यांना सर्वांत सोयीस्कर रचना असते.
लोकशाही म्हणजे जबाबदार शासनपद्धती पण दुर्दैवाने जबाबदारपणा कुठेच दिसत नाही. ही जबाबदारीची जाणीव केवळ सामान्य जनतेतच नव्हे देशाचा व स्थानिक संस्थांचा कारभार चालविण्यास निघालेल्या राजकीय कार्यकर्त्यांतही असलेली दिसत नाही. लोकशाहीतील जनतेचे राज्य म्हणजे कसलेही श्रम न करता आपल्याला मुक्तपणे खाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेले कुरण आहे, अशी या कार्यकर्त्यांची भावना बनली आहे. महाविद्यालयात असताना कसलाही अभ्यास न करणारा, अभ्यास न करणाऱ्या मुलांचे टोळके घेऊन फिरणारा मात्र संघटनकौशल्य असणारा तरुण हा आता लोकशाहीतील नवा राजकीय कार्यकर्ता बनत आहे. सामाजिक कार्याची तळमळ, चारित्र्य, सामाजिक विषयाचा अभ्यास, त्याग करण्याची तयारी या साऱ्या गोष्टी गैरलागू बनलेल्या आहेत.अशा राजकीय कार्यकर्त्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यत एक जमात बनली आहे.
निवडणूक जिंकणे हे आजच्या लोकशाहीचे सर्वांत महत्त्वाचे अंग बनले आहे. ‘लोकशाही म्हणजे निवडणूक जिंकणे व मग राजकारण, कारभार करणे’ असे समीकरण बनले आहे.आणि निवडणूक जिंकण्ासाठी भाषणे, आश्वासने,एका प्रभागात सरासरी पंधरा वीस उमेदवार. प्रत्यकला जनसेवा करायची आहे, असे ते म्हणतात.निवडणुकीच्या मार्गाने सत्ताधारी बनणे हा लोकांना पिळण्याचा एक मार्ग बनला आहे. अता जनतेला माहीत असणारे उघड सत्य आहे. एकविसाव्या शतकातली सुशिक्षित शहरातली सुसज्ज महापालिकेतील ही जागृत जनता आहे. इथे काम करणाराच नगरसेवक बनता है प्रभाग क्रमांक 24 मामुर्डी ,किवळे ,रावेत, विकासनगर ,एम बी कँप अशी रंगतदार चर्चा चर्चेचा आढावा घेतला प्रेस मीडिया लाईव्ह पिंपरी चिंचवड प्रतिनिधी पठाण एम एस यांनी विविध भागातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, यातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे की इच्छुकांपेक्षा नागरिकांमध्ये निवडणुकीचा उत्सहा दिसत आहे. जनुकाय नागरिकच एका सच्च्या काम करणाऱ्या तडफदार नगरसेवकाला निवडून देण्याची वाट पाहत आहे.