आपल्या मताचा वापर काम करणाऱ्या तडफदार नगरसेवकाला निवडून आणण्यासाठी केला पाहिजे

 आपल्या परिसराला विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा...


प्रेस मीडिया ऑनलाईन :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :  पठाण एम एस :

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तसे राजकारण तापत चालले आहे. आणि तापलेल्या राजकारणावर पोळ्या भाजणारे  भुरटे कार्यकर्ते प्रभागात वावरू लागतात ज्याचा स्वतःचा मतदान ही नसतो तोच परिसरात मतदारांचा ठेकेदार असल्याचे भासवतो ,आणि स्वतःच्या हितासाठी,खिसे गरम करण्याच्या हेतूने चार तरुणांना  बरोबर घेऊन मिरवतो. आणि प्रत्येक इच्छुक जनप्रतिनिधींना आकर्षित करण्याचे व गल्ली मोहल्ल्यामध्ये माझ्या सांगण्यावरून लोक मतदान करतील असे भासवत मिरवणाऱ्या भुरटे कार्यकर्त्यांपासून इच्छुक जन प्रतिनिधींनी ही आता वेळीच सावध व्हायला हवं,आणि नागरिकांनी ही सावध व्हायला हवं . 

हीच ती घाण आहे जो आपल्या परिसराला विकासापासून वंचित ठेवते  हे आता नागरिकांसमोर उघड झाल आहे, आपल्या प्रभागात विकासासाठी प्रयत्नशील, प्रतिबद्ध, असलेला कार्यकर्ता तोच सच्चा कार्यकर्ता आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या मताधिकाराचे महत्त्व समजून घेऊन असा प्रतिनिधी निवडण्यासाठी सहकार्य केले पाहिजे , जो कोणताही भेदभाव न करता , निःपक्षपातीपणे  आपल्या प्रभागाचे विकासात सहकार्य करेल आणि लोकांच्या हितासाठी आणि त्याच्या विकासासाठी कार्य करेल .  म्हणूनच प्रत्येक नागरिकाने आपल्या मताचा वापर काम करणाऱ्या तडफदार नगरसेवकाला निवडून आणण्यासाठी केला  पाहिजे , कारण  मतदारच आपापल्या प्रभागांचे व  परिसरात विकासाचे खरे चित्र ठरवणार.

निवडणुकांमध्ये स्थानिक स्तरावरील समस्यांची सोडवणूक करण्यासाठी मतपेटीच्या माध्यमातून योग्य प्रतिनिधी निवडणे आवश्यक , व आजच्या आधुनिक काळाची खरी गरज आहे. या निवडीवरच प्रत्यक प्रभागाचे विकासाचे नियोजन आणि सामाजिक विकास अवलंबून असणार आहे. म्हणून मुक्त आणि निर्भय वातावरणात मतदारांनी मतदान करायला हवे. निवडणुकांच्या वेळी कोणत्याही प्रलोभनाला, स्वार्थाला किंवा दबावाला बळी न पडता आपल्या मताधिकाराचा उपयोग करायला हवा. योग्य पद्धतीने केलेले मतदान आपल्या हक्काचे रक्षण करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असते हे नेहमी लक्षात ठेवायला हवे.



प्रेस मीडिया ऑनलाइन :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post