तडफदार युवा नेते सांगर लांगे यांनी सर्व पक्ष सामाजिक संस्था व्यापारी वर्ग व अन्य नागरिकांना एकत्रित करण्यात मिळवले यश..
प्रेस मीडिया ऑनलाईन
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एम
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड विविध समस्यांना सामोरे जात असताना छावणी हद्दीत प्रवेश शुक्ल हि बंद झाले, त्यात निधीचा अभाव खर्चाची टंचाई, अशा परिस्थितीत नागरिकांच्या समस्या सोडवणार कोण असा प्रश्न उपस्थित होत होता,देहू रोड छावणी हद्दीत रस्ते, रस्त्यावरचे तुटलेल्या दुभाजक, वाहनतळ, वीज, पाणी ,नागरी भागात दुर्दशा मय शौचालय , दुर्गंधीत कचराकुंड्या, स्वच्छता, असे विविध प्रश्न मार्गी लागणार कसे या सर्व बाबींच्या विचाराने सागर च्या मनात एक वादळ निर्माण झालं आणि त्या वादळातून सर्व पक्ष सामाजिक संस्था व्यापारी वर्ग व नागरिक एकत्र आले,
सागर लांगे यांच्या पुढाकारातून रहिवासी सामाजिक संस्था अनेक राजकीय पक्ष यांनी मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची भेट घेऊन नागरिकांच्या व्यापक हितासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चे नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी पाठिंब्याची पत्रे सुपृद केली.
देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीच्या नागरिकात सर्वस्तरातून सागर लांगे यांचे कौतुक केले जात आहे .