राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ...
प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवरअली शेख :
पिंपरी - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या उक्तीप्रमाणे खासदार श्रीरंग आप्पा बारणे पक्षविरहित सामाजिक काम करतात. त्यामुळे त्यांना पिंपरी-चिंचवड मधून मोठे मताधिक्य मिळते.पिंपरी- चिंचवडचा महापालिकेचा आगामी महापौर ठरविण्यात खासदार बारणे यांची भूमिका निर्णायक असणार आहे, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आदर्श व्यक्ती, संस्थांचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, माजी मंत्री, शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर, खासदार बारणे यांच्या पत्नी सरिता बारणे, युवा सेनेचे राजेश पळसकर, पुण्याचे शहरप्रमुख गजाजन धरगुडे, सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे, वैशाली मराठे, उर्मिला काळभोर आदी उपस्थित होते. मंत्री सांमत म्हणाले, 'खासदार बारणे यांनी करोना काळात हॉस्पिटलने जास्त आकारलेल्या बिलाची रक्कम रुग्णांना परत मिळवून दिली. त्यांचे कार्य आदर्शवत आहे.'
आदेश बांदेकर म्हणाले, 'खासदार बारणे कुटुंबाप्रमाणे नागरिकांची काळजी घेतात. मतदारसंघातील नागरिकांसाठी नेहमी धडपड करतात. ते स्वतःपेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करतात.' सचिन अहिर म्हणाले, 'खासदार बारणे लोकसभेत मतदारसंघातील प्रश्न पोटतिडकीने मांडून मार्गी लावतात. ते शिवसेनेतील रत्न आहेत.' खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, 'माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील सदस्याला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. त्यांच्यामुळे मी देशाच्या लोकसभेत काम करून माझी ओळख निर्माण करू शकलो.' फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार यांनी नियोजनात पुढाकार घेतला.
या वेळी वारकरी पुरस्काराने हभप बंडोपत शेळके, हभप महादेव भुजबळ, आधार पुरस्काराने कष्टकरी संघटनेचे बाबा कांबळे, सेवा पुरस्काराने वृद्धाश्रम चालविणाऱ्या डॉ. अविनाश शैलजा शांताराम वैद्य, क्रीडा शिक्षक पुरस्काराने बन्सी आठवे, कामगार भुषण पुरस्काराने किशोर ढोकळे, सौंदर्यवती पुरस्काराने पूनम डायडेम, स्वामी भुषण पुरस्काराने ज्येष्ठ नागरिक हरी शेळके, शौर्य पुरस्काराने धनश्री जाधव, समाजभुषण पुरस्काराने आपला परिवाराचे एस.आर. शिंदे, पोलीस मित्र पुरस्काराने गजानन चिंचवडे, क्रीडा पुरस्काराने ऋतुराज गायकवाड समाज भुषण पुरस्काराने मंदार देव महाराज, क्रीडा पुरस्काराने सायकलिंग करणारे बाबा भोईर, तसेचे भाऊसाहेब कोकाटे, स्वामी पुरस्काराने स्वामी समर्थ मंडळ, निसर्ग पुरस्काराने जगन्नाथ जरग, वृक्ष मित्र, वृक्ष संवर्धन, कर्तव्य भुषण पुरस्काराने वाकड ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, आदर्श भुषण पुरस्काराने ग्रीन्स सोसायटी, पर्यावण पुरस्काराने जगन्नाथ वैद्य, धन्वंतरी पुरस्काराने डॉ. सुधीर भालेराव, आदर्श सोसायटी पुरस्काराने पार्क स्ट्रीट सोसायटी आणि उद्योग भुषण पुरस्काराने संतोष बारणे यांचा सन्मान करण्यात आला.