तीन चार दिवस शिधा पत्रिकेच्या कामा निमित्त येणाऱ्या नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन.
प्रेस मीडिया लाईव्ह
पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :
पिंपरी चिंचवड – सर्व्हर बंद पडल्याने शिधापत्रिकांचे ऑनलाइन कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प पडले आहे. पिंपरी आणि चिंचवड विभागातील सुमारे ६०० ते ६५० शिधापत्रिकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाल्याची माहिती
परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे यांनी दिली आहे, ऑनलाइन शिधापत्रिकांचे कामकाज चालणाऱ्या यंत्रणेचा सर्व्हर १८ तारखेपासून बंद आहे. त्यामुळे त्यावर चालणारे कामकाज थांबले आहे. ही यंत्रणा पुर्ववत सुरू होण्यासाठी आणखी चार दिवस लागणार आहे. पिंपरी आणि चिंचवड विभागाच्या ६०० ते ६५० शिधापत्रिकांच्या ऑनलाइन कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे.
१८ तारखेपासून हे काम सुरू असलेल्या संकेतस्थळाचा सर्व्हर बंद पडला आहे. त्यामुळे त्यावर चालणारे सर्व कामकाज थंडावले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हरच बंद पडल्याने ऑनलाइन शिधापत्रिकांच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. आणखी चार दिवस हे काम बंद राहणार असल्याने त्याबाबत कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे तरी शिधापत्रिका कमा साठी येणाऱ्या नागरिकांनी सहकार्य करावे अशी विनंती अन्न धान्य नगरी पुरवठा परिमंडळ निगडी येथील अधिकारी दिनेश तावरे यांनी केली आहे.