पिंपरी-चिंचवड मनपातील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काढला अतिविराट मोर्चा

शहर राष्ट्रवादीच्या इतिहासातील हा अभूतपूर्व मोर्चा ठरला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

अनवरअली शेख :

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अतिविराट मोर्चा काढला. राष्ट्रवादीचे झाडून पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले.गटा-तटाला तिलांजली देत सर्व नेतेगण एकत्र आल्याने आणि प्रचंड मोठा मोर्चा निघाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी पहिल्याच मोर्चात आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. पक्षातील मगरळ दूर केली. कार्यकर्त्यांना 'चार्ज' केले. त्यांना पक्षातील सर्वच नेते, पदाधिकाऱ्यांनी मनापासून साथ दिली. सुमारे पंधरा हजार लोकांचा मोठा मोर्चा काढून तो यशस्वी करुन दाखविला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मोर्चाची नोंद घेणे महत्त्वाचे ठरते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्मच मूळात सत्तेत झाला. त्यामुळे राष्ट्रवादीतील पदाधिका-यांना आंदोलने, मोठे मोर्चे काढणे, ते यशस्वी करणे कधी जमले नव्हते. तो त्यांचा पिंड नाही, असे बोलले जाते. महापालिकेतील सत्ता गेल्यापासून तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी मरगळ, नैराश्य आले होते. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटनेत फेरबदल केले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग चारवेळा नगरसेवक असलेल्या अजित गव्हाणे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली. शांत, संयमी, मितभाषी असलेल्या गव्हाणे यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्यास सुरुवात केली.संघटनेतील सर्व आजी-माजी पदाधिका-यांशी संपर्क साधला. सर्वांना विश्वासात घेऊन महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढण्याचे यशस्वी नियोजन केले. राष्ट्रवादीतील नेते गट-तट बाजूला ठेऊन अजित गव्हाणे यांच्या छताखाली एकत्र आले आणि महापालिकेवर भव्य असा मोर्चा निघाला. सर्वजण मरगळ झटकून एकत्र आले. पहिल्यांदाच पदाधिकारी, कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आपला प्रबळ शत्रू भाजप असून भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी सर्वजण एकवटले. अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी पदाधिकारी सरसावल्याचे दिसून आले.

राष्ट्रवादीचे झाडून पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते. गटा-तटाला तिलांजली देत सर्वजण एकत्र झाले. नेते एकत्र आल्याने आणि प्रचंड मोठा मोर्चा निघाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात सर्व एकदिलाने सहभागी झाले. मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मोर्चा यशस्वी झाल्याने गव्हाणे यांच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब झाले.

शहराध्यक्ष गव्हाणे यांनी मोर्चातून चुणूक दाखवत आपल्या पुढील कामाची दिशा स्पष्ट केली. वरकरणी शांत, संयमी वाटणाऱ्या गव्हाणे यांनी जहाल भाषण केले. सत्ताधाऱ्यांवर सडेतोड, आक्रमकपणे हल्लाबोल केला. त्यातून त्यांची आक्रमकता दिसून आली. शहरवासीयांनी मोर्चाची दखल घेतली. शहर राष्ट्रवादीच्या इतिहासातील हा अभूतपूर्व मोर्चा ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post