पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अतिउच्च दाबाच्या वाहिन्यांमध्ये बिगाड

  पिंपरी-चिंचवड विभागात वीज खंडित झाल्यामुळे त्यामुळे पाणी पुरवठा होणार नाही.




प्रेस मीडिया ऑनलाईन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

पिंपरी चिंचवड रावेत दि ९ फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या 400 KV अतिउच्च दाब वाहिन्यांवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रावेत येथील  अशुद्ध जलउपसा केंद्र व सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा सकाळी ६ पासून खंडीत झालेला आहे. MSEDCL मार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. तथापी काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित आहे. 

त्यामुळे संपूर्ण शहराचा आजचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. नागरिकांना आवाहन करणेत येते की त्यांनी पाणी जपून वापरून सहकार्य करावे. प्रवीण लडकत सहा शहर अभियंता पाणीपुरवठा विभाग यांनी अशी माहिती दिली आहे 


प्रेस मीडिया लाईव्ह  : 

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post