थेरगाव भाई , ना थेरगाव क्वीन , इथे फक्त पोलिसच किंग - अपना वतन

" अपना वतन " संघटने तर्फे उत्कृष्ठ कामगिरीबद्दल वाकड पोलिसांचा गौरव ..

प्रेस मीडिया ऑनलाइन :

अपना वतन संघटना मागील अनेक वर्षांपासून समाजातील सर्व घटकांसाठी प्रबोधन ,जनजागृती व आंदोलनाच्या माध्यमातून कार्यरत आहे. समाजातील कामगार ,शिक्षक , शेतकरी ,विद्यार्थी ,महिला ,शासकीय कर्मचारी ,पोलीस या सर्वांना विविध प्रश्नसनमध्ये न्याय मिळवुन देण्यासाठी अपना वतन प्रयत्नशील असते. आज शनिवार दि. ५/०२/२०२२ रोजी अपना वतन संघटनेच्या वतीने सामाजिक जाणिवेतून वाकड पोलीस स्टेशनमधील सर्व वरिष्ठ अधिकारी , तपास पथकाचे अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी वाकड पोलिसांनी बिट कॉइन ,थेरगाव क्वीन ,थेरगाव भाई बिस्कीट प्रकरण या  केलेल्या कारवाईचा विशेष उल्लेख करण्यात आला.  



  यावेळी सर्व पोलीस बांधवाना अपना वतन संघटनेच्या वतीने शाल ,नारळ ,पुष्पगुछ व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख यांनी सांगितले कि, कोरोनाकाळात पोलीस बांधवांना आपल्या जीवाची पर्वा न करता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे श्रम घेतले. पोलीस यांच्या वर्दीमधे आपल्यासारखाच एक सामान्य  मनुष्य लपलेला आहे, त्यांच्याही व्यथा ,प्रश्न ,अडचणी आपण  समजून घेतल्या पाहिजेत . पोलिसांच्या चुकीच्या कांमांवर बोट ठेवत असतानाच त्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव केला पाहिजे .काही प्रसंगी प्रामाणिक पोलीस अधिकारी यांच्यावर राजकीय दबाव व अपरिहार्य  कारणांमुळे संकट आली तर अपना वतन संघटना  त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास व्यक्त केला. 

               यावेळी वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) संतोष पाटील यांनी सांगितले कि, आपल्या या सत्कारामुळे आमच्यावरील जबाबदारी वाढली असून आम्हाला दृष्ट प्रवृतीं विरोधात कायदेशीर  लढण्यासाठी बळ मिळाले आहे. पोलीस निरीक्षक ( गुन्हे २) रामचंद्र घाडगे यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील ,पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल , पोलीस उपनिरीक्षक संगीता बोडे यांनी मनोगत व्यक्त केले. 

           कार्यक्रमावेळी बाबाजान इनामदार ,राजेंद्र काळे ,बापूसाहेब धुमाळ ,जावेद पठाण,विजय गंभीरे ,विक्रम कुदळ ,वंदू गिरे ,प्रमोद कदम ,प्रशांत गिलबिले ,अतिक शेख ,विक्रांत चव्हाण ,अजय फल्ले ,कौंतेय खराडे ,दीपक साबळे ,अतिश जाधव ,कल्पेश पाटील,भास्कर भरती ,विनायक म्हसकर ,मधुकर कोळी ,स्वप्नील लोखंडे ,दीपक गायकवाड ,सचिन सापते या पोलीस बांधवाना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. 

     या कार्यक्रमचे आयोजन अपना वतन संघटनेचे महिलाध्यक्षा राजश्री शिरवळकर , कार्याध्यक्ष हमीद शेख , सामाजिक कार्यकर्त्या अर्चना मेंगडे , तौफिक पठाण ,मुस्तफा तांबोळी ,कयूम शेख , हमीद मणियार , शाकीर सय्यद यांनी केले होते. 


मा. सिद्दीकभाई शेख : संस्थापक ,अध्यक्ष , अपना वतन 

संघटना : मो. ९६६५४८४७८६

Post a Comment

Previous Post Next Post