प्रभाग एक मध्ये इच्छुक अनेक परंतु यावेळी जनता जनार्दन मात्र वेगळ्याच अँक्शन मोड मध्ये
प्रेस मीडिया ऑनलाइन :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :
पिंपरी चिचवड महापालिका निडणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर होताच पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय तापमानाचा पारा चढला, आजी ,माजी , इच्छुक , कार्यकर्ते धाव-पळ गाठी भेटी सुरू झाल्या आहेत तर श्रेय घेण्याचे राजकारण सुद्धा चांगलेच तापलेले दिसत आहे .प्रभाग एक मध्ये इच्छुक अनेक परंतु यावेळी जनता जनार्दन मात्र वेगळ्याच अँक्शन मोड मध्ये दिसत आहे.
नव्या रचणेनुसार प्रभाग २४ मामुर्डी,किवळे रावेत ते विकास नगर या प्रभागातील आढावा घेतला प्रेस मीडियाचे पिंपरी चिंचवड प्रतिनिधी पठाण एम एस यांनी नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पिंपरी-चिंचवड महापालिके मध्ये समाविष्ट झाल्यानंतर हा प्रभाग शहरातील दुसर्या प्रभागा नुसार प्रगती करु शकला नाही नागरिक याची खंत व्यक्त करत आहे . तर यावेळी आम्हाला मोठमोठे वादे नको , लंबे चौडे भाषण नको आणि ती ऐकायला आमच्याकडे वेळ ही नाहीये, वीज पाणी नियमित हवय, स्वच्छता हवीय, परिसरात दुर्गंधीत कचरा कुंड्या नकोय, साप सूत्रे स्वच्छतागृह हवीये, पावसाळ्यात पाणी साचणारे मैदान नकोय, चिखलमय रस्ते नकोत , दिवसाआड पाणी पुरवठा नको तर नियमित हवा आहे. मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदान गार्डन हवी आहे, प्रभागाच्या झोपडपट्टी भागामध्ये स्वच्छताग्रुहाचे आभाव आहे, तसेच विद्युतवाहिन्या अजून जमिनी खालून करायचे काम पूर्ण झालेले नाही , कित्येक सोसायट्या आणि वस्त्या अशा आहेत ज्यांना अजून डांबरीकरणाची रस्ते नाही, भाषण करणारे जन प्रतिनिधी व बिनकामाचे पुढारी नकोत तर काम करणारे हवेत , अशी रंगतदार चर्चा नागरिकांमध्ये सध्या रंगत आहे