सभागृहात आवाज उठवून या... विषयास न्याय देण्याचे काम कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी केले नाही

 याचा जाब विचारण्यासाठी जवाब दो आंदोलन.


प्रेस मीडिया लाईव्ह

 पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करून  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत व पीएमआरडीए मध्ये विलीनीकरण केलेल्या अनियमित बांधकाम धारकांना जागेचे प्रॉपर्टी कार्ड देवून घरे नियमित करण्याच्या व जाचक असा जुलमी शास्तीकर सरसकट माफ करण्यासाठीच्या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी (लोकसभा / विधानसभा) यांच्या कार्यालया समोर बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी *जवाब दो* या संबळ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे,कारण पिंपरी चिंचवड मधील प्राधिकरणातील घरे नियमित तसेच त्या जागेचे सातबारा भोगवटादारांच्या नावे केले जात नाहीत,पण या प्रश्नाचे राजकारण प्रत्येक महापालिका,विधानसभा आणि लोकसभेच्या निवणुकीत केले जाते. पण येथील प्रतिनिधी  नगरसेवकाचे आमदार,खासदार झाले,पण या प्रश्नाबाबत सभागृहात आवाज उठवून या विषयास न्याय देण्याचे काम कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी केले नाही.याचा जाब विचारण्यासाठी जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे.

धनाजी येळकर पाटील

स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ ( समन्वयक )

  *आंदोलनाचे ठिकाण व वेळ....* 

मा. श्रीरंग आप्पा बारणे 

(खासदार मावळ लोकसभा) यांचे कार्यालय.

वेळ: सकाळी १० ते ११

मां. लक्ष्मण भाऊ जगताप

(आमदार चिंचवड विधानसभा) यांचे कार्यालय.

वेळ:दुपार १२: ते १:००

मा.महेशदादा लांडगे

(आमदार,भोसरी विधानसभा)यांचे कार्यालय.

२:००ते ३:००

मा. अमोलजी कोल्हे( खासदार शिरूर लोकसभा)यांचे भोसरी येथील कार्यालय

३:३० ते ४:३०

मा. आण्णा बनसोडे(आमदार पिंपरी विधानसभा)यांचे कार्यालय

५:०० ते ६:००.


प्रेस मीडिया लाईव्ह

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post