अनधिकृत जनसंपर्क कार्यालये थाटणाऱ्या नगरसेवकांना प्रशासना कडून नोटिस देण्याची कार्यवाही सुरू

नोटिसा मिळताच नगरसेवकांची धावपळ सुरू झाली..


प्रेस मीडिया लाईव्ह:

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अन्वरअली शेख :

पिंपरी चिंचवड महानगरपालिका तर्फे निवडणुकीच्याकाळात अनधिकृत जनसंपर्क कार्यालये  थाटणाऱ्या नगरसेवकांना प्रशासनाने नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे  अनधिकृत जनसंपर्क कार्यालय थाटलेल्या नगरसेवकांना महापालिकेच्या बांधकाम विभागाने नोटिसा बजावल्या आहेत . 

प्रभाग रचना बदलल्यानंतर नगरसेवकांनी नव्या प्रभागात जनसंपर्क कार्यालये थाटली होती . काहींनी पत्राशेड , महापालिका जागेत फुटपाथवर अनधिकृतपणे जनसंपर्क कार्यालये थाटली आहेत . तर , काहीजणांच्या कार्यालयांची कामे सुरू आहेत . नगरसेवकांच्या अनधिकृत जनसंपर्क कार्यालयाबाबत इच्छुकांनी विरोधकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या . त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाने सर्व्हे केला . तसेच , जनसंपर्क कार्यालयांची बीट निरीक्षकांच्या माध्यमातून पाहणी केली . त्याचा पाहणी अहवाल आला असून , त्यानुसार अनधिकृत जनसंपर्क कार्यालय थाटलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांना नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे . आता प्रशासन किती नगरसेवकांच्या अनधिकृत जनसंपर्क कार्यालयांवर कारवाई करते , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

अनधिकृत बांधकामप्रकरणी नगरसेवकपद रद्द होऊ नये , पुढील निवडणूक लढविण्यास अपात्र ठरू नये यासाठी नोटिसा मिळताच नगरसेवकांची धावपळ सुरू झाली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post