प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
पिंपरी चिंचवड थेरगांव येथे ए. जे. सिटी हॉस्पिटल नुकतेच या हॉस्पिटल चे उद्घाटन हाजी गुलजार साहेब अध्यक्ष जमियत उलमा पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात आले.
या बाबत प्रेस प्रेस मीडिया लाईव्ह चे पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी यांना मिळालेल्या माहितीनुसार या रुग्णालया मध्ये गरीब गरजू लोकांना विशेष सवलत देण्यात आली आहे , तसेच प्रसूती साठी येणाऱ्या स्त्रियांनाही या हॉस्पिटलमध्ये विशेष सवलत प्राप्त करून देण्यात आलेली आहे .
अशी माहिती पिंपरी-चिंचवड जमियात उलमा हिंदी चे अध्यक्ष हाजी गुलजार यांनी माहिती दिली .या हॉस्पिटल मध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहे लिफ्ट , वेंटीलेटर आणि आईसीयू (ICU) ३० बेड या ठिकाणी हॉस्पिटल मधे उपलब्ध आहेत आणि ICU साठी १० बेड वर आधारित असून डॉ जावेद (अर्थो स्पेशलिस्ट) , डॉ अंजुम (स्रीरोग स्पेशलिस्ट) या अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन या हॉस्पिटलला लाभलेला आहे , या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या वेळी विविध संस्थेचे मान्यवर व जमिय त उलमा पिंपरी-चिंचवड चे अध्यक्ष हाजी गुलजार व अन्य मान्यवर उपस्थित होते.