भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा.
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जस-जशी जवळ येत आहे नगरसेकांची धावत्या गाडीत बसण्याची होड लागलेली दिसत आहे. पिंपळे निलख येथील भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनीही आज दि .२४ त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे सोपवला आहे . आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची गळती थांबताना दिसत नाही. गेल्या दहा दिवसात तीन नगरसेवकांनी भाजपाला रामराम ठोकला आहे .येत्या निवडणुकीत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत जाणार असल्याचे संकेत दिलेत . तरुण , हुशार , अभ्यासू नगरसेवक अशी कामठे यांची ओळख आहे .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे , मुख्य प्रवक्ते योगेश बहल , महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील , नगरसेवक नाना काटे , मयूर कलाटे उपस्थित होते .
नुकत्याच निवडणुकीच्या तोंडावर कामठे यांच्या रूपात भाजपला धक्यावर धक्का बसला आहे .अशी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण फुटल आहे.