पिंपरी चिंचवड महानगरपाकेची शव वाहिका पुष्पक ची अवस्था चेहरा नुरानी एडिया फटी हुई अशी झाली आहे

  पुष्पक शववाहिनीच्या दुरवस्थेमुळे अंत्ययात्रेत आलेल्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

प्रेस मीडिया ऑनलाईन

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस


पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील आकुर्डी या ठिकाणी अंत्ययात्रेसाठी महापालिकेची शववाहिका पुष्पक  *MH12 FC 9477* स्थानिक लोकांनी महापालिकेतून आणण्यात आली होती, पुष्पक शववाहिनीच्या दुरवस्थेमुळे अंत्ययात्रेत आलेल्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला, अंत्यविधी दरम्यान कबरस्तान मध्ये दफनविधीस जाण्यासाठी जनाजा गाडी मध्ये ठेवल्यानंतर पाऊण तास गाडी चालू होईना त्यामुळे अत्य विधी साठी आलेले नातेवाईक व स्थानिक नागरिकांना भरपूर मनस्ताप झाला.  स्थानिक नागरिकांनी भरपूर रोष व्यक्त केला आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अत्यंत श्रीमंत महानगरपालिका आहे आणि याठिकाणी या अशा प्रकारे  दुरवस्था झालेल्या शववाहिका वापरात आणल्या जात आहे. महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत जन प्रतिनिधींनी व  अधिकारी यांनी या गंभीर आणि अति महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष  द्यावं अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते मौलाना अब्दुल गफार साहेब यांनी व्यक्त केली आहे. तर  नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


पिंपरी चिंचवड प्रतिनिधी  : पठाण एम एस

Post a Comment

Previous Post Next Post