भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याने भाजपला भूकंपाचे धक्के बसायला सुरवात



प्रेस मीडिया लाईव्ह :

अनवरअली शेख :

 पिंपरी चिंचवड महानगपालिकेचे निवडणूक जशी जशी जवळ जवळ येऊ लागली आहे तसे तसे राजकिय घडामोडींना गती येऊ लागली आहे  राजकिय वातावरण आता तापण्यास  सुरुवात झाली आहे .  निवडणुका जवळ आल्या की नेत्यांचे या पक्षातून त्या पक्षात कोलांट्या उड्या मारण्यास सुरुवात होते .सर्व राजकीय  पक्षांची निवडणुकीची तयारी  सुरू झाली आहे . तर दुसरीकडे भाजप मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागल्याने भाजपला भूकंपाचे धक्के बसायला सुरवात झाली आहे.  

नुकतेच भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने भाजपला आतून धक्के बसू लागले आहेत.तसेच पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचे समर्थक व निकटवर्तीय नगरसेवकाने राजीनामा दिल्याने जोरदार खळबळ उडाली आहे. या वेळची महानगरपालिेची निवडणूक रती महारतीना घाम फोडणारी ठरणार आहे. भाजप मधील अंतर्गत  नाराज असलेले कार्यकर्ते  भाजप सोडतात की काय अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकंदरीत ही निवडणूक कोणालाही सोपी जाणार नाही हे नक्की. जनता जनार्दनचा काय  कौल होतो हे निवडणुकीनंतरच कळणार..

Post a Comment

Previous Post Next Post