कॉँग्रेसच्या आडून महाराष्ट्रावर वार , पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ कॉँग्रेसच्या वतीने आज बुधवारी राज्यभर भाजप कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार

 पंतप्रधानांच्या मोठमोठय़ा सभा झाल्या त्याचे काय..?


प्रेस मीडिया ऑनलाइन :

कोरोना लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे देशात कोरोना पसरला असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत बोलताना केला.कॉँग्रेसच्या आडून महाराष्ट्रावर वार करण्याच्या केलेल्या या प्रयत्नामुळे राज्यात सर्वत्र मोदी व केंद्रातील भाजप सरकार विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा अपमान करणाऱया पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी राज्यभर भाजप कार्यालयांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

देशात कोरोना पसरकण्यास महाराष्ट्रातील काँग्रेस आणि दिल्लीतील 'आप' कारणीभूत आहेत. या पक्षांनी महाभयानक संकटातही गलिच्छ राजकारण केले, असा आरोप मोदी यांनी केला होता. त्यावर कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कोरोनाच्या संकटाच्या सुरुवातीला 'नमस्ते ट्रम्प'सारखे कार्यक्रम करून मोदींनीच देशात कोरोना वाढवला. पंतप्रधान मोदी हेच कोरोनाचे खरे सुपर प्रेडर आहेत, अशी घणाघाती टीका पत्रकार परिषदेत केली.

पंतप्रधान संपूर्ण देशाचा असतो याचाही त्यांना विसर पडला आहे. त्यांनी पंतप्रधानपदाची गरिमा घालवली असून ते फक्त भाजपचे प्रचारक झाले आहेत, असा टोला पटोले यांनी लगावला.

योगी-केजरीवाल ट्विटर वाॅर

तिकडे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात 'ट्किटर वाॅर' रंगले आहे. 'सुनो केजरीकाल' या योगींच्या ट्विटला केजरीवाल यांनी 'सुनो योगी' असे प्रत्युत्तर दिले आहे. उत्तर प्रदेशातील नदीमध्ये लोकांची प्रेते तरंगत होती आणि तुम्ही करोडो रुपये खर्च करून टाइम्स मॅगझीन मध्ये जाहिराती देत होता. असे क्रुर आणि निर्दयी राज्यकर्ते मी कधी पाहिले नाहीत, असे ट्किट केजरीवाल यांनी केले आहे.

सर्वात जास्त ट्रेन गुजरातमधून सोडल्या

रेल्वे मंत्रालयाची आकडेवारी काय सांगते… कोविड काळात देशातील विविध राज्यांतून तब्बल 3060 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. त्यात गुजरातमधून 853, महाराष्ट्रातून 550, पंजाबमधून 333, उत्तर प्रदेश 221 आणि दिल्लीहून 181 ट्रेन सोडण्यात आल्या होत्या.

'पंतप्रधान' राज्यांमध्ये द्वेष का पसरवत आहेत?

महाराष्ट्राबद्दल पंतप्रधान मोदी असं का बोलले, याचं वाईट वाटतंय. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा उल्लेख कोविड सुपर प्रेडर म्हणून केला हे धक्कादायक आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मोदी हे भाजपचे नाही, तर देशाचे पंतपधान आहेत. महाराष्ट्राबद्दल असं का बोललात? राज्यांमध्ये द्वेष का पसरवताय? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

कोरोना काळात पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, आसाम या राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या सर्कच बडय़ा नेत्यांच्या मोठमोठय़ा प्रचारसभा झाल्या त्याचं काय, अशा शब्दांत कॉँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी कॉँग्रेसमुळे देशात कोरोना वाढला असे म्हणणाऱया मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post